पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर फुलले कमळ पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

eReporter Web Team

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर फुलले कमळ
पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर):- राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राज्यभरात पक्षांतराच्या चर्चेला उधान आले होते. ट्विटर हँडलवरून भाजपाचे कमळ काढून टाकल्यानंतर आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी संपर्काचा दावा केल्यानंतर भाजपामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. काल पक्षाध्यक्षांनी पंकजाताई पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा करत पत्रकार परिषद घेतली होती. तीन दिवसांच्या चर्चेनंतर आज पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर कमळ उमलले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त टाकलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी खासकरून कमळ चिन्ह टाकला आहे. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मदिनी गोपीनाथ गडावर आपण आपला पुढील मार्ग काय? आपली शक्ती काय? यावर भाष्य केले होते त्यामुळे पंकजा मुंडे भाजपात अस्वस्थ आहेत आणि त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, ही चर्चा सुरू झाली. दुसर्‍या दिवशी पंकजा मुंडेंच्या ट्विटर हँडलवरून भाजपाचं चिन्ह दिसून आलं नाही आणि त्याच दिवशी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंसह भाजपातले अनेक आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा बॉम्बगोळा टाकला. त्यामुळे काल दिवसभर पंकजा मुंडेंच्या पक्षांतरावर राज्यभरात चर्चा सुरू झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे असा निर्णय घेणार नाहीत, असा विश्‍वास दाखवला. परंतु पंकजा मुंडे स्वत:हून याबाबत कुठलीच प्रतिक्रिया देत नसल्याने ‘दाल मे कुछ काला है’ अशी स्थिती पंकजा मुंडेंच्या बाबत राज्यभरात दिसून येऊ लागली. अखेर या सर्व अटकळींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आज पंकजा मुंडे यांच्याकडून झाला आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर आज कमळ उमलला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज १३६ वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांना विनम्र अभिवादन या पोस्टद्वारे केले आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये भाजपाचे चिन्ह कमळ याचा देखील वापर केला आहे. त्यामुळे पंकजांच्या पक्षांतराच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याचे चिन्ह असले तरी १२ तारखेला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
पंकजा मुंडेंचा नवा गट?; गोपीनाथ गडावर होणार शक्तीप्रदर्शन
भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपातील सुंदोपसुंदी बाहेर येऊ लागली आहे. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या आहेत. विशेषतः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामागे पक्षातील लोक असल्याचा दावा केला आहे. दोघांच्याबरोबर आता माजी प्रकाश मेहताही नाराज असून, खडसे आणि मेहता गोपीनाथ गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like