डॉ. प्रियंका रेड्डीच्या मारेकर्‍यांना फाशी द्या केज, गेवराईत विद्यार्थ्यांचा मोर्चा

eReporter Web Team

डॉ. प्रियंका रेड्डीच्या मारेकर्‍यांना फाशी द्या
केज, गेवराईत विद्यार्थ्यांचा मोर्चा
केज/गेवराई (रिपोर्टर):- हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाने देशभरात संताप व्यक्त केला जात असून आज गेवराई आणि केज येथील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी विद्यार्थीनींच्या वतीने करण्यात आली आहे. 
   गेल्या तीन दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. नराधमांनी डॉक्टर असलेल्या प्रियंका रेड्डी या तरुणीवर अत्याचार करत तिला जाळून ठार मारले. या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज केज येथील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी तहसीलदार आशा वाघ यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. प्रा. हनुमंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. तर गेवराई येथील अट्टल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. 


अधिक माहिती: beed police

Related Posts you may like