बीडची तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत शनिवारपासून संपर्क तुटला होता, आई सोमवारी पुण्याला गेल्यानंतर खळबळजनक प्रकर उघडकीस आला, सिंहगड पोलिसांचा तपास सुरू 

eReporter Web Team

बीडची तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत
शनिवारपासून संपर्क तुटला होता, आई सोमवारी पुण्याला गेल्यानंतर खळबळजनक प्रकर उघडकीस आला, सिंहगड पोलिसांचा तपास सुरू 
पुणे/बीड (रिपोर्टर):- पुणे शहरातील माणिक बाग परिसरात एका २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे येथील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदरची तरुणी ही मूळची बीड येथील असल्याचे सांगण्यात येते. तेजसा शामराव पायाळ असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव असून सदरची तरुणी ही गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये आली होती. येथून ती एकटीच पुण्याला गेल्याचे सिंहगड पोलिसांकडून सांगण्यात आले. बीडमध्ये मात्र ती प्रॉपर शहरातली आहे की अन्य कुठल्या गावातली आहे हे कळू शकले नाही. 
   सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजसा शामराव पायाळ (वय २८) ही मुलगी मूळची बीड येथील असून तिचे एमबीएपर्यंत शिक्षण झाल्याचे सांगण्यात येते. मागील काही महिन्यांपासून नोकरीच्या शोधासाठी तेजसा आपल्या आई व दोन बहिणींसह पुणे येथे आली होती. सिंहगड रोडवरील माणिक बागेत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये आई व दोन बहिणींसह तेजसा राहत होती. आठवडाभरापूर्वी तेजसा व तिची आई आणि बहिण बीडला आल्या. काही कामानिमित्त तेजसा तिन दिवसांपूर्वी बीड येथून पुणे या ठिकाणी  गेली होती. शनिवारपासून तिची आई तेजसा हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती मात्र संपर्क होऊ न शकल्याने आई सोमवारी बीड येथून पुण्याला गेली. फ्लॅटवर गेल्यानंतर फ्लॅटला कुलूप असल्याने आईला संशय आला. तिने आपल्याकडील दुसर्‍या चावीने फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा बेडवर संशयास्पद अवस्थेत तेजसाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती तात्काळ सिंहगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तेजसाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा शोध पोलिस घेत आहेत. 


अधिक माहिती: beed police

Related Posts you may like