ताज्या बातम्या

आ. संदीपभैय्या रात्री मुंबईवरून आले, आज सकाळी जनतेच्या दारात गेले

आ. संदीपभैय्या रात्री मुंबईवरून आले, आज सकाळी जनतेच्या दारात गेले
प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन तात्काळ कामे सुरू
बीड (रिपोर्टर):- बीड शहरातील लोकांच्या मुलभूत गरजांसह अडीअडचणी सोडवण्यासाठी आज भल्या पहाटे आ. संदीप क्षीरसागर हे शहरातील शिक्षक कॉलनी, सम्राट चौक, हनुमान चौक, क्रांतीनगर, सागर गॅरेज लाईन, डी.पी. रोड, तहसीलचा पाठीमागील परिसर आदी भागात जावून स्वच्छता, वीज, पाणी यासह मुलभूत प्रश्‍नांवर उपस्थित जनतेशी चर्चा करून ते सोडवण्यासाठी प्रशासनातील यंत्रणेला तत्काळ आदेश दिले आणि ते कामेही सुरू झाले. आ. संदीप क्षीरसागर हे रात्रीच मुंबईहून बीडमध्ये आले आणि आज सकाळी ते जनतेच्या दारात गेले. 
  सरकार स्थापनेपासून अधिवेशनापर्यंत मुंबईत डेरेदाखल असलेले बीडचे लोकप्रिय युवा आमदार संदीप क्षीरसागर हे रात्री मुंबईवरून बीड शहरात आले. आज सकाळीच संदीप क्षीरसागरांनी शहरातल्या काही भागांमध्ये भेटी दिल्या. यामध्ये शिक्षक कॉलनी, सम्राट चौक, शाहूनगर, हनुमान चौक, क्रांतीनगर, सागर गॅरेजलाईन, डी.पी. रोड, तहसीलचा पाठीमागील परिसर आदी भागात जावून तेथील जनतेशी संवाद साधत स्वच्छता, वीज, पाणी यासह अन्य मुलभूत प्रश्‍नांवर चर्चा केली. लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेता जिथे पाण्याची अडचण आहे तिथे अधिकारी, कर्मचार्‍यांना बोलून ते सोडविले. ज्या ठिकाणी वीज आणि स्वच्छतेचा प्रश्‍न आहे त्याबाबतही प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेत ही कामे तात्काळ सुरू केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून संदीप क्षीरसागरांनी शहरातील नागरिकांच्या मुख्य प्रश्‍नांना हात घालत ते सोडवण्याचा चंग बांधल्याचे दिसून येते. शहरातील खड्‌ड्यापासून, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नापर्यंत अवघ्या महिनाभरात लक्ष घातल्यानंतर आता स्वच्छतेच्या प्रश्‍नी संदीप क्षीरसागर प्रामुख्याने लक्ष घालताना दिसून येत आहेत. आज आ. संदीप क्षीरसागरांच्या सोबत माजी आ. सय्यद सलीम, नगरसेवक प्रभाकर पोपळे, गणेश तांदळे, रमेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, ऍड. इरफान बागवान, कर्डुले आबा, बाळासाहेब शिंदे, पवन तांदळे, अक्षय जाधव, राजू महुवाले, संभाजी मुंढे, महावीर कोठारी यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरीक आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review