ताज्या बातम्या

नूतन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार 

नूतन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार 
सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार 
बीड (रिपोर्टर):- बीडला प्रथमच महिला जिल्हाधिकारी लाभलेल्या आणि आपल्या कर्तव्यात कठोर असलेल्या श्रीमती प्रेरणा देशभ्रतार या आपल्या पदभार येत्या सोमवारी स्वीकारणार असल्याचे समजते. 
   आस्तिककुमार पाण्डेय यांचा बीड येथील आठ ते दहा महिन्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला. मात्र कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपली बदली औरंगाबाद येथे करून घेतल्यानंतर बीड येथे प्रथमच महिला जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार आलेल्या आहेत. सन २०१० च्या आएएस बॅचच्या अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आहेत. जालना जिल्हा परिषदेच्या काही काळ त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होत्या. त्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाला शिस्त लावली होती. विशेषत: जिल्हा परिषद प्रशासनातल्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप त्यांनी थांबवला होता. सध्या त्या पुणे येथील यशदा या प्रशिक्षण संस्थेत महासंचालक पदावर कार्यरत आहेत. काल त्यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर येत्या सोमवारपर्यंत त्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. एक कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून देशभ्रतार यांची प्रशासनावर छाप आहे. त्यामुळे बीड येथील अवैध वाळू उपसा किंवा अवैध गौण खनिज यावर त्या वचक बसवतील असा विश्‍वास बीड येथील प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review