कापसाला वाढीव दोन हजाराचे अनुदान द्यावे  साडेपाच हजारात खर्चही निघत नाही

eReporter Web Team

कापसाला वाढीव दोन हजाराचे अनुदान द्यावे 
साडेपाच हजारात खर्चही निघत नाही
बीड (रिपोर्टर):- कापसाला शासनाचा ५ हजार ५५० रुपये भाव आहे, मात्र हा भाव शेतकर्‍यांना परवडणारा नाही. वेचणीलाच क्विंटलमागे हजार रुपये द्यावे लागतात. इतर खर्च तर वेगळाच. त्यासाठी शासनाने क्विंटलप्रमाणे वाढीव दोन हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी गंगाभीषण थावरे यांनी केली आहे. थावरे यांनी आज सकाळी भोपा येथील जीनिंगवर भेट देऊन शेतकर्‍यांचे माप योग्य घेण्याच्या सूचना संबंधित जीनिंग ग्रेडरला दिले आहेत. 
  या वर्षी अतिरिक्त पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शासनाचा कापसाला ५ हजार ५५० रुपये भाव आहे. हा भाव शेतकर्‍यांना परवडणारा नाही. शासनाने शेतकर्‍यांना क्विंटलमागे दोन हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी गंगाभीषण थावरे यांनी केली असून त्यांनी आज तेलगावजवळील भोपा जीनिंगवर भेट देऊन शेतकर्‍यांच्या मापात पाप नको, अशा सूचना संबंधित ग्रेडरला दिल्या आहेत. शासकीय भाव ५ हजार ५५० असला तरी ग्रेडर कापसात काटछाट करत शंभर-दोनशे भाव कमी लावत असून सदरील कमी भाव लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही थावरे यांनी दिला आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like