तांदळे यांचा  घरकुलाचा पदभार तडकाफडकी काढला

eReporter Web Team

तांदळे यांचा 
घरकुलाचा पदभार तडकाफडकी काढला
बीड (रिपोर्टर):- बीड पंचायत समितीमधील बांधकाम सहाय्यक सचिन तांदळे हे रमाई घरकूल योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्रास देत होते. उद्दिष्टामधील घरकुलांसाठी पाच हजार रूपये तर उद्दिष्टबाहेरील घणकूलांसाठी दहा हजार रूपयांची प्रति लाभार्थी प्रति घरकुल मागणी करायचे. याबाबत काल सायं.दै.बीड रिपोर्टरने वृत्त प्रकाशित करताच त्याची गंभीर दखल अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे आणि गटविकास अधिकारी तुरूकमारे यांनी तांदळे यांचा पदभार तडकाफडकी काढला. 
तांदळे हे गेल्या दोन वर्षापासून बीड पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्ती कार्यरत होते. त्यांच्याकडे रमाई घरकुल योजनेचा पदभार होता. त्यामुळे घरकुल लाभार्थी हे अतिशय सामान्य कुटुंबातील असल्याने तांदळेचा त्रास त्यांना परवडणारा नव्हता. तांदळे यांच्या कार्यपद्धतीबाबत काल सायं.दै.बीड रिपोर्टरने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची गंभीर दखल अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेत त्यांच्याकडील पदभार काढला. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी सुटकेचा निश्‍वास घेतला. 


अधिक माहिती: beed zp

Related Posts you may like