‘अरे सागरा-सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा’ हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन

eReporter Web Team

‘अरे सागरा-सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा’
हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन
बीड (रिपोर्टर):- ‘अरे सागरा-सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा’ भारतीय घटनेचे शिल्पकार विश्‍वभूषण दिन दलितांना अखिल मानव जातीला माणुस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आज बीड शहरवासियांनी आणि भीम बांधवांनी हजारोच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी आ.संदिप क्षीरसागरांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
बाबासाहेबांचे कर्तृत्व हे अख्ख्या जगात अधोरेखित झालेले आहे. जगातील ज्या दहा विद्वानांचा उल्लेख केला जातो त्यात बाबासाहेबांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. बाबासाहेब यांनी दिनदलितांसाठी अहोरात्र काम केले. भारतामध्ये पशुपेक्षाही दलित बांधवांना हिनतेची वागणुक दिली जाते. ज्या पाण्यावर माणसाचे जीवन अवलंबून आहे असे पाणी पिण्यासही दलित बांधवांना मज्जाव केला जात होता. त्यासाठी बाबासाहेबांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्यग्रह केला. दलितांच्या न्याय हक्कासाठी अनेक सत्याग्रह केले, आंदोलने केले. बाबासाहेबांचे कर्तृत्व इतकेच नव्हते तर भारताची राज्यघटना लिहिण्याचे कामही त्यांनी केलेे. घटना समिती अंतर्गत मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. जगातील अर्ध्या देशांच्या घटनांचा अभ्यास करून तीन वर्षे अखंड मेहनत घेत स्वतंत्र भारताची जागतिक आदर्श घटना बाबासाहेबांनी लिहिली. आज बाबासाहेबांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या पुतळ्याला हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी सह विविध स्तरातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी आ.संदिप क्षीरसागर, पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्‍वास पाटील, पो.कॉ.राजाभाऊ वडमारे, प्रेमदास साळवे, कैलास पाबळे, पंचम वडमारे, वसंत जायभाय अनेक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like