पतीने पूर्व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला, घात करून अपघाताचा बनाव केला

eReporter Web Team

     पत्नीही गरीबाची असो वा श्रीमंताची असो, पत्नीही पत्नीच असते. पत्नीला देवीचे रूप मानले जाते. घरात साक्षात पत्नीला महालक्ष्मीच समजले जाते. मात्र ज्या परिवारात प्रेम, वात्सल्या, सुख, शांतता, आपुलकीची भाषा, एकमेकांचा आदर, सन्मानाची वागणूक अशा सर्व गोष्टींचा वास होतो, याच ठिकाणी लक्ष्मी सहवास करत असते. जर एखाद्या कुटुंबात वेळोवेळी पत्नीचा अपमान करणे, तिला कमी समजणे, तिच्याशी हुज्जत घालने, सतत तिला मारहाण करणे, स्वतःचेच खरे करून दाखवणे, सदैव व्यसनाच्या आहारी जाणे, आणि देवी सारख्या निरपराध पत्नीला त्रास देण्याचा ठेकाच घेणे, आणि स्वतःला मोठा बादशहा समजणे, असा हा प्रकार जेव्हा एखाद्या परिवारात घडत असतो, तेव्हा तो संसार बरबादी च्या वाटेवर उभा राहतो. याला  तो पतिच जबाबदार असतो. पण पत्नीच कारणीभूत असल्याचा तो ठपका ठेवत असतो. अशावेळी पत्नीचे व त्याचे वेळोवेळी खटके उडतात. वादाने वाद पेट घेतात. तेव्हा पती-पत्नी एक दुसऱ्यापासून वेगळे राहण्याचे स्वीकारतात. अशावेळी तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. संशयाचं भूत त्याच्या डोक्यात भरतं शेवटी  तो तीचा घात करण्याचा प्रयत्न करतो. अशीच ह्रदय हेलावणारी दर्दनाक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात घडली.

  बीड शहरापासून तब्बल 80 किलोमीटर अंतरावर आष्टी नावाचा, वेळोवेळी चर्चेत असणारा तालुका आहे. सामाजिक, राजकीय घटना या तालुक्यात वेळोवेळी घडत असल्याने, हा तालुका सर्वांच्या परिचयाचा झाल्यासारखा झाला आहे. सर्वत्र तालुक्यात सामाजिक जीवन जगत असताना, स्थिर वातावरण तर काही ठिकाणी, सहनशील पणा दिसून येतो. आणि याच तालुक्यात काही ठिकाणी काही महाशय रांगडा आवाज करत, गुन्हेगारी सारखं भेदक पाऊल उचलण्याची हिंमत दाखवताना दिसतात. याच आष्टी तालुक्यात चिखली नावाचे खेडेगाव आहे. या गावात शंकरावर यांचे कुटुंब वास्तव्यास होते. त्यांचा एक मुलगा होता .त्याचे नाव नितीन आवारे असे  होते. सुमारे आठ नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नितीन चे लग्नाचे वय झाले होते. आवारे परिवाराने नितीनच्या लग्नाचा विचार मनावर घेतला. तेव्हा सोनाली या युवती बरोबर नितीन चा विवाह पक्का झाला. काही दिवसातच त्यांच्या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर आवारे कुटुंब आष्टी शहरात मुर्शदपुर भागात येऊन स्थायिक झाले. त्यानंतर नितीन आवारे याने दूध डेअरीचा व्यवसाय टाकला. काही दिवस त्याचा हा दूध डेअरी चा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू होता. नित्यनियमाने तो दूध डेअरी चा व्यवसाय चालवायचा. मात्र पुढे काही दिवसांनी त्याच्या दूध डेरी ला दुधाची कमतरता भासू लागली. आणि काही कालांतराने नितीन आवारे यांची दूध डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आली        इकडे त्याची पत्नी सोनाली ही सुरुवातीला आष्टी शहरातीलच धोंडे यांच्या संस्थेअंतर्गत असणाऱ्या बीएड बीपी एड महाविद्यालयात सुमारे सात-आठ वर्षे तिने लिपिक पदावर काम पाहिले. व ती नित्यनेमाने तिची ड्युटी बजावत होती. व तिचा पती हा दूध डेरी व्यवसायाकडे लक्ष द्यायचा. कालांतराने  त्याचा हा दूध डेअरी व्यवसाय दुधाच्या अभावाने बंद पडला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने एक हॉटेल चालविण्यास घेऊन हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. पत्नी नित्यनियमाने ड्युटीला जायची. व हा पती आपला व्यवसाय पहायचा. काही दिवसांनी त्या पती-पत्नीत काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर बरेच दिवस त्यांचे हे वाद वाढतच गेले. पुढे चालून पत्नी ड्युटीला असल्याने टापटीप पणात राहायची. स्कूटी वर जायची. दोघात बोलता बोलता विरोध व्हायचा. या सर्वच गोष्टी पतीच्या मनात खटकायच्या.  पुढे चालून पती-पत्नीचे पटतच नव्हते. हा तिच्या प्रत्येक वागण्याला विरोध करू लागला. संशयाच्या रूपात तिला पाहू लागला .आणि दिवसेंदिवस पत्नी सोनाली ही आपल्या पतीच्या विरोधाला कंटाळून गेली. ती काही दिवसांनी त्याच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हती. त्याच्या येणाऱ्या प्रत्येक शब्दाचाही विरोध करू लागली. त्यां आवारे दांपत्यांना एक मुलगी झालेली होती. तिचे नाव प्रगती असे होते.  ही मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली.एक मुलगी झाल्यानंतरही हे पती-पत्नी भानावर आले नाही. त्यांच्या वादाच्या ठिणगीने पेठ  घेतलेला सुरूच होता. असा हा त्यांचा वाद दिवसेंदिवस सुरूच राहिला. पत्नी सोनाली विषयी काही गोष्टी पती नितीन च्या मनात घर करून बसलेल्या होत्या. पुढे पत्नी त्याच्या बोलण्याला कसल्याच प्रकारे प्रतिसाद देत नव्हती. उलट दोघे एकमेकांच्या विरोधातच असायचे. व त्याला वाटायचे माझी पत्नी असून ही माझं का ऐकत नाही? माझ्या शब्दात का राहत नाही? व इकडे पत्नीला वाटायचे माझा पती माझ्याच विरोधात का बोलतो. मलाच का विरोध करतो. मग मी का त्याला घाबरायचे मला स्वतःला नोकरी आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे. मग मी तुला का घाबरायचे. नोकरीच्या हवेत सोनाली बाई ही आपल्या पतीला घाबरत नव्हत्या. पुढे काही दिवसांनी त्यांचा हा वाद असाच वाढत गेला. दोघा पती-पत्नीच्या मनात संशयाचे जाळे पसरलेले होते. शेवटी जे व्हायचे तेच झाले. कोठेही दोन व्यक्तीचे जमत नसले तर ते एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. त्याच पद्धतीने पत्नी सोनाली व पती नितीन यांनी एकमेकांपासून विभक्त राहण्याचे ठरवले. यानंतर सुमारे सात वर्षांपूर्वी या पती-पत्नी मध्ये घटस्फोट झाला.

      घटस्फोटानंतर दोघेही पती-पत्नी एकमेकापासून वेगळे झाले. त्यांची मुलगी प्रगती ही लहान असल्याने ही तिची आई सोनाली हिच्या जवळच राहायची. घटस्फोटानंतर आता एकमेकांना एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा कोणताच अधिकार राहिलेला नव्हता. त्यामुळे दोघांनाही आपापल्या पद्धतीने वागण्याचे, जाण्यायेण्याचे, मनमोकळे अधिकार मिळालेले होते. त्यामुळे आता कोण कोणाचा वालीच राहिलेला नव्हता. घटस्फोटानंतर सोनाली ही आपली एकुलती एक असणारी मुलगी प्रगती ला घेऊन आष्टी शहरातील मुर्शदपुर भागातील, पोकळे हॉस्पिटल च्या बाजूला, असणाऱ्या महादेव कॉलनीत तिचे घर होते. तिथे ती राहत होती. तर् नितीन आवारे याचेही त्याच मुर्शतपुर भागातील एका गल्लीत घर होते. दोघांचा एकमेकांवर चा अधिकार उडाल्यानंतर नितीन आवारे याने आपला संसार सुरू राहावा, या उद्देशाने दुसरे लग्न केले. यानंतर दुसऱ्या पत्नीबरोबर त्याचा संसार सुरळीत चालला दुसऱ्या पत्नीलाही एक मुल आहे.

   पुढे काही वर्षांनी धोंडे यांच्या संस्थेने सोनाली हिची बीएड बीपीएड महाविद्यालयातून बदली करून त्याच्याच संस्थेच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात तिची लिपिक पदावर बदली केली. काही दिवसांनी तिची मुलगी प्रगती हिचे संदेश मुळीक यांच्यासोबत लग्न करून दिले. तेव्हा ती मुलगी कधी आईकडे, आष्टी शहरात तर कधीच सासरी पुण्याला ये जा करायची. पतीपासून वेगळे झाल्यानंतर सोनाली च्या विभक्त राहण्यात  खूप मोठा बदल झालेला होता. तिचे राहणीमान बदलल्यासारखे दिसत होते. याची बाब नितीन आवारे याच्या मनात वेळोवेळी खटकत होती. तिला पाहता त्याच्या मनात जहर उतरत होते. या बाईचे आता काय करावे? व काय नाही असा प्रश्न त्याच्या मनामध्ये घुमत होता. हिचा कायमचाच काटा काढावा की काय असे त्याच्या मनात चलबिचल होत होते. पतीला सोडून सोनालीने घटस्फोट घेतला होता. व स्वतःच्या हिमतीवर विभक्त राहत याच भागात नितीन आवारे च्या नाकासमोर राहत होती. आपल्यापासून विभक्त झाल्याने सर्व समाजात नातेवाईकात आपल्या प्रतिष्ठेला कलंक लागला. आपली सारी किंमत कमी झाली. आपल्याला समाजात चारचौघात तोंड वर काढू वाटत नाही. अशे अनेक प्रश्न त्याच्या मनात घर करत होते. सोनाली हि वाईट चालीची आहे, असा तो तिच्या विषयी नातेवाईक अथवा मित्रमंडळींना सांगायचा. तो तिच्याकडे वेगळ्या नजरेने पहायचा, व तिच्या चारित्र्याविषयी वेळोवेळी संशय घायचा. संशय त्याच्या मनातच बसलेला असायचा.  आष्टी शहरातीलच भाऊसाहेब बापूराव धोंडे नितीन आवारे याचा खास मित्र होता.  नितीन हा वेळोवेळी त्याच्या सुखदुःखाच्या गोष्टी मित्र भाऊसाहेब याच्याजवळ सांगायचा. त्यालाही नितीन ची दया यायची दोघांनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा केली. आणि त्यांच्या लक्षात एक कल्पना सुचली. आपली सर्वत्र किंमत कमी करणाऱ्या, व चारित्र्य खराब असणाऱ्या या बाईचा काटा काढला पाहिजे. तेव्हाच आपल्याला शांतता मिळेल. व समाधान वाटेल. असे त्याच्या मनात भिनू लागले. नंतर त्या दोघा मित्रांच्या मनात  तिला संपवण्याचा कट लक्षात आला. स्कुटीवर रस्त्याने जात असताना तिचा घात करायचा. व वाहनाने धडक झाल्याचे सांगत पोलिसांना व सर्वत्र बनाव सांगायचा. असाच या दोघा मित्रांनी पक्का निर्धार केला. तिला संपवण्यासाठी बऱ्याच दिवसापासून ते योग्य परिस्थिती ची वाट पाहत होते. कधी आपल्याला योग्य मोका मिळेल, त्यानंतर आपला डाव साधेल, याची ते वाटच पाहत होते. त्यामुळे तिच्यावर ते दोघे बऱ्याच दिवसापासून नजर धरून बसले होते. शेवटी 11 नोव्हेंबर 2019 चा दिवस उजाडला. त्यांच्या मनातील कल्पना सत्यात उतरण्याचा योग आला.

   आष्टी शहरा तील बसस्थानकापासून पश्चिमेला पाचशे मीटर अंतरावर किनारा नावाचा एक चौक आहे. आणि याच चौकाजवळ दक्षिण दिशेला ईदगाह नावाचे एक एक भले मोठे मैदान आहे. हे मैदान मोठे असल्याने या मैदानात मोठ्या सभा होत असतात. व सर्वत्र मोकळे आणि खुले वातावरण असते. दिनांक 11 नोव्हेंबर च्या दिवशी सोनाली सापते ही काहीतरी कामानिमित्त आपल्या घरून शहरात आलेली होती. तेव्हा या दोघांनी तिला शहरात आलेले पाहिले होते. आपली मनातील कल्पना पूर्ण करण्यासाठी तो तिच्या पाळतीवरच होता. शहरातील काम उरकल्यानंतर ती आपल्या घरी मुर्शदपुर येथील महादेव कॉलनी कडे जाण्यास निघाली. तिला घराकडे जाण्यासाठी ईदगाह मैदानतूनच जावे लागते. हे या दोघांना माहीत होते. म्हणून नितीन व त्याचा मित्र भाऊसाहेब त्याची पिकप क्रमांक एम एच बेचाळीस बी 48 46 ला घेऊन ,अगोदरच मैदानावर ते हजर झाले होते. संध्याकाळची वेळ होती. सात वाजले होते. सर्वत्र अंधार पडलेला होता. व ऐन त्याच वेळेला परिसरातील लाईट गायब झालेली होती. मैदानाकडे सोनाली स्कुटीवर वर येत असल्याचे पाहताच, दोघे सावध झाले होते. तिला जवळ येऊ दिले. व पिकप आडवा लावून तिला थांबवून धरले. तेवढ्यात नितीन आवारे याने पिकप मधील लोखंडी अवजड तांबी बाहेर काढली व मोठ्या ताकदीने तिच्या डोक्यात मारली. व तिच्या डोक्याच्या मेंदूच बाहेर पडला. डोक्याला मार लागताच ती जमिनीवर कोसळली. आणि जागीच ठार झाली. परिसरातील लाईट गेल्याने कोणाचा कोणाला मेळ लागला नव्हता. लाईट गेलेली असल्याने तिकडे कोणी लवकर फिरकलेच नाही. नीतीने तिचा घात करून अंधारात ताबडतोब फरार झाला. व त्याचा मित्र भाऊसाहेब याने जवळ असणारी पिकप घेऊन आष्टी पोलीस ठाणे गाठले. या दोघांनी मिळून तिची हत्या केली. मात्र पोलिसांना पिकअप व स्कुटीची समोरासमोर धडक होऊन सोनाली ही जागीच मयत झाल्याची खोटी माहिती सांगितली. स्वतःच आरोपी असून पोलिसांना बनव दाखवण्याचा प्रयत्न केला. पण धोंडे आणि आवारे यांना हे माहीत नव्हते की, कानून के हात बहुत लंबे होते है, घटनेची माहिती मिळताच तात्काळ आष्टी ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उप अधिकारी विजय लगारे यांनीही तात्काळ धाव घेऊन पाहणी केली. यावरून त्यांना असे दिसून आले की, की एवढ्या मोठ्या ईदगाह मैदानात दोन वाहनांची धडक होणे अशक्य दिसून आले. दुसरी बाब म्हणजे तिच्या डोक्याला लागलेला मार हा अपघाताचा नसून, कोणत्यातरी जड वस्तू ने मारलेला घाव होता. या सर्व बाबी वरून पिकपवाल्या वरचा संशय आता वाढलेला होता. त्याला पोलिसांनी बोलावून ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या मनात घबराहट, चेहऱ्यावरचा रंग, बोलण्यात तफावत, अडखळलेली भाषा,या सर्व बाबी पोलिसांना आढळून आल्या पोलिसांनाही पक्का अंदाज आलेला होता. तेवढ्यात मयताची मुलगी प्रगती ही पुण्याहून आपल्या आईच्या निधनाची बातमी कळताच, आष्टी मध्ये दाखल झाली आणि मोठा आक्रोश करू लागली. तिने पोलिसांना जबाब दिला की मी वेळोवेळी आईकडे यायचे, तेव्हा आई मला सांगायची, माझ्या आईचे व वडिलांचे वेळोवेळी चारित्र्याच्या संशयावरून भांडण व्हायचे. हा माझ्या आईचा अपघात नसून, वडील नितीन आवारे आणि त्याचा मित्र भाऊसाहेब धोंडे या दोघांनी संगनमताने मिळून, जाणून-बुजून डोक्यात मारून तिचा खून केला. असा जबाब दिला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रगती संदेश मुळीक वय 21, धंदा घरकाम, रा. वडगाव शेरी, तालुका जिल्हा पुणे. हिच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शंकर आवारे व त्याचा मित्र भाऊसाहेब बापूराव धोंडे रा. आष्टी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 312/ 2019 नुसार कलम 302, 34 भादवि गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी नितीन आवारे व त्याचा मित्र भाऊसाहेब धोंडे यांना शोधून ताब्यात घेतले. व त्यांच्या मुसक्या आवळत  त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले. तरीही ते अंग झटकण्याचा प्रयत्न करतच होते. अपघातच झाल्याचा  बनाव वेळोवेळी सांगत होते. शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पोपटासारखे खरे बोलण्यास सुरुवात केली. सोनाली वर माझा चारित्र्याचा संशय होता. त्यामुळे समाजात आमची प्रतिष्ठा खराब होत चालली होती. म्हणून मी तिची हत्या केल्याची आवारे याने कबुली दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली.

     सदर कामगिरी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक साईप्रसाद पवार, पोलीस हवालदार बन्सी जायभाय, पोलीस हवालदार अनिल आगलावे, पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड, अजित शिकेतोड, सुमित करंजकर, सचिन कोळेकर, शिवप्रसाद तवले, यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या बारा तासात खुनाचा उलगडा केला. व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.

    संकलन 
प्रा सुनिल जाधव 
उपसंपादक दै बीड रिपोर्टर 
मो ९८२२६३७९२८


अधिक माहिती: pro.sunil jadhav beed

Related Posts you may like