ताज्या बातम्या

पेन्शन कर्मचार्‍यांचे गेवराईत आंदोलन

पेन्शन कर्मचार्‍यांचे गेवराईत आंदोलन
गेवराई (रिपोर्टर):- पेन्शन कर्मचारी संघटनेच्यावतीने दिल्ली येथे पेन्शन धारकांचे आंदोलन सुरू असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेवराई येथील पेन्शन धारकांनी गेवराई बसस्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन केलेे. 
पेन्शन संघटनेच्यावतीने विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गेवराई येथील पेन्शन संघटनेच्या कर्मचार्‍यांच्यावतीने मोर्चा काढून तहसील कार्यालयाससमोर आंदोलन केले. यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी २०१४ मध्ये ७ हजार ५०० मंजूर पेन्शन महागाई भत्त्यासह मिळावी, आरोग्य भत्ता मंजूर व्हावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review