अकरा महिन्यात १९४ शेतकर्‍यांनी संपवले जिवन गेल्यावर्षी १९७ शेतकर्‍यांनी केल्या होत्या आत्महत्या, तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 

eReporter Web Team

अकरा महिन्यात १९४ शेतकर्‍यांनी संपवले जिवन
गेल्यावर्षी १९७ शेतकर्‍यांनी केल्या होत्या आत्महत्या, तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 
मजीद शेख | बीड
  शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्याच्या बाता आणि घोषणा सर्वच पक्षाचे नेते करत असतात. मात्र शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. कर्जबाजारी, नापिकी, अतिरिक्त पाऊस, दुष्काळ अशा चक्रव्युहात शेतकरी सापडतात. त्यामुळे  शेतकर्‍यांचे आर्थीक गणीत कोलमडते. खिश्यात पैसा नसल्याने व मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेती मालाला योग्य भाव येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्य येते आणि यातच शेतकरी आपले जिवन संपवत आहे. गेल्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यातील १९४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधीक ३६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. गेल्यावर्षी १९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. शासनाने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षामध्ये राज्यात जवळपास १३ हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. विदर्भानंतर मराठवाड्यात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या होत आहे.सत्तेवर कोणीही बसलं तरी शेतकर्‍यांच्या जिवनामध्ये क्रांती होत नसल्याचे दिसून येवू लागले. शेती मालाला नसणारा भाव, दुष्काळ, अतिरिक्त पाऊस, यामुळे शेतकरी चक्रव्युहात सापडतो. याच नैराश्यतेतून तो आत्महत्या करत आहे. यावर्षी अकरा महिन्यात १९४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वांधीक ३६ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जिवन संपवले आहे. गेल्यावर्षी १९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकाचे पूर्णतः नुकसान
कापसाला दोन ते तिन क्विंटलचाच निघाला उतारा

यावर्षी खरीप पिके चांगली आली होती. मात्र परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने कापूस, बाजरी, सोयाबीन या पिकांचे जवळपास ९० टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अधिकच खचला. कापसातून चार पैसे हाती येत असतात पण कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापसाला यंदा एका बॅगमागे दोन ते तिन क्विंटलचा उतारा निघाला. त्यातच हलक्या जमीनीत एक क्विंटल याप्रमाणेही उतारा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी  आर्थीक संकटात लोटला गेला आहे. अतिरिक्त पाऊस ऑक्टोंबर नोव्हेंबर या दरम्यान झाला होता. या अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांनी जास्तच धास्ती घेतली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वांधीक आत्महत्याच्या घटना घडल्या आहे. 

२०१९ मधील 
एकूण आत्महत्या 

जानेवारी २०१९     - १७
फेब्रुवारी २०१९     - ११
मार्च २०१९         - १९
एप्रिल २०१९     - १७
मे २०१९         - १३
जून २०१९         -१९
जुलै २०१९         -२८
ऑगस्ट २०१९     - ११
सप्टेंबर २०१९     - १०
ऑक्टोबर २०१९     -१३
नोव्हेंबर २०१९     -३६


अधिक माहिती: beed

Related Posts you may like