Latest News

ताज्या बातम्या

कर्जबाजारी,नापिकीला कंटाळून दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

कर्जबाजारी,नापिकीला कंटाळून दोन शेतकर्‍यांची आत्महत्या
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात जवळपास दोनशे पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 
गुंदेवाडी येथील तुकाराम उमाजी कानडे (वय ३६) या शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन केल्याने त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील शेतकर्‍याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना गेवराई तालुक्यातील तागडगाव येथे घडली. शिवाजी भाऊसाहेब मोटे (वय ५०) या शेतकर्‍याने शौचालयाला जातो म्हणून काल सायंकाळी घराबाहेर गेले व त्यांनी जाळून घेवून आत्महत्या केली. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review