बीडमध्ये ३५ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

eReporter Web Team

बीडमध्ये ३५ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या
बीड (रिपोर्टर):- शहरातील तक्षशीलनगर धानोरा रोड येथील एका ३५ वर्षीय इसमाने स्वत:च्या घरात गळफास घषवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणला. 
चंद्रकांत काशिनाथ ठोकळ (वय ३५)  असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही. गेल्या तीन महिन्यापासून त्यांची पत्नी माहेरी मुंबई येथे आहे  व त्या आल्यानंतरच शवविच्छेदन होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like