Latest News

ताज्या बातम्या

धनंजय मुंडेंकडून पत्रकाराची दखल ‘आमचंही लक्ष आहे बरं का!’ केली पोस्ट

धनंजय मुंडेंकडून पत्रकाराची दखल
‘आमचंही लक्ष आहे बरं का!’ केली पोस्ट
बीड (रिपोर्टर):- सर्वसमावेशक विचार करण्याची पद्धत अन् सर्वच क्षेत्रांकडे बारकाईने लक्ष ठेवणारे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे पत्रकारांकडेही तेवढेच लक्ष असल्याचे त्यांच्या एका फेसबुक पोस्टवरून दिसून येते. काल त्यांच्या फेसबुक पोस्टवर एका इलेक्ट्रॉनिक दूरचित्रवाहिनीच्या पत्रकाराचा फोटो शेअर केला असून आमचंही लक्ष आहे बरं का! असं म्हणत लोकशाही सदृढ करण्याचे कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांना माझा सलाम. असं ना. मुंडेंनी म्हटलं आहे. 
  गेल्या दोन दिवसांपूर्वी परळीत ना. मुंडेंचा न भुतो न भविष्यती असा नागरी सत्कार झाला. हा सोहळा कव्हर करण्यासाठी प्रिंट मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियाने बहुगर्दी केली होती. लाईव्ह चित्रण करण्यासाठी टी.व्ही.९ या मराठी दूरचित्रवाहिनीचे महेंद्र मुधोळकर आणि त्यांचा कॅमेरामन अत्यंत कमी जागेत दाटीवाटीत चित्रांकण करत होते. कॅमेरामनला महेद्र मुधोळकरांच्या डोक्याचा सहारा घेत चित्रण करावं लागलं, असा फोटोच थेट धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुकवर शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टवर ‘आमचंही लक्ष आहे बरं का!’ असं शिर्षक लिहित माझ्या नागरी सत्कारावेळी कार्यक्रम लाईव्ह दाखवणार्‍या पत्रकारांची मी लाईव्ह टिपलेली ही छबी, जीवाची परवा न करता कुटुंबापासून दूर राहून लोकशाही सदृढ करण्याचे काम बजावणार्‍या पत्रकारांना माझे सलाम. सरकार पत्रकारांचे मुलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असं लिहिलं आहे. धनंजय मुंडे हे सर्वसमावेशक विचार करतात, सर्व क्षेत्रांकडे बारकाईने पाहतात हेच यावरून दिसून येते. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review