धनंजय मुंडेंच्या जागेवर संजय दौंड विधान परिषदेवर जाणार दौंडांनी केला आज उमेदवारी अर्ज दाखल; २४ ला मतदान 

eReporter Web Team

धनंजय मुंडेंच्या जागेवर संजय दौंड विधान परिषदेवर जाणार
दौंडांनी केला आज उमेदवारी अर्ज दाखल; २४ ला मतदान 
भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी लढत
बीड (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभेच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्यानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच गेल्या दोन दशकांपासून जिल्हा परिषदेवर काम करणारे कॉंग्रेसचे संजय दौंड हे धनंजय मुंडे यांच्या जागेवर आमदार म्हणून काम करणार असून आज दौंड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत होणार असून २४ तारखेला या जागेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान भाजपाच्या वतीने राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
   राज्याचे सामाजीक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कोणाला संधी मिळणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या जागेवर जातील, अशी चर्चा होत होती. मात्र अचानक बीड जिल्ह्यातील परळी येथील कॉंग्रेसचे संजय दौंड यांचे नाव समोर आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना विजयी करण्यासाठी दौंड यांनी प्रयत्नांची परीकाष्ठा केली होती. प्रथमच राष्ट्रवादीच्या जागी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यास विधान परिषदेत पाठविले जात आहे. संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांचे पवार कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. यामुळे संजय दौंड यांना ही संधी दिली जात असल्याचे सांगण्यात येते. धनंजय मुंडे यांची जागा रिक्त झाल्यामुळे या जागेसाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने संजय दौंड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी २४ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढत होत असून या जागेवर संजय दौंड हे मोठ्या मतांनी विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like