ताज्या बातम्या

‘त्या’ अधिकार्‍यांची आता एसीबीमार्फत चौकशी  निवडणूक खर्च घोटाळा प्रकरण

‘त्या’ अधिकार्‍यांची आता एसीबीमार्फत चौकशी 
निवडणूक खर्च घोटाळा प्रकरण
बीड (रिपोर्टर):- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूक विभागाकडून खर्च करण्यात आला. यामध्ये ५ कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याची ओरड झाल्यानंतर आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त करून संबंधित अधिकार्‍यांची चौकशी केली. त्या समितीने सदरचा अहवाल हा एसीबीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा आल्याने आता या प्रकरणाची चौकशी एसीबीमार्फत करण्यात येणार असल्याने भ्रष्ट अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 
  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीडच्या निवडणूक विभागातील अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचे दाखवले. यामध्ये ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याची ओरड झाली. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली. समितीने गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन दिवस निवडणूक विभागातील निर्णय अधिकार्‍यांसह अन्य लोकांची कसून चौकशी केली. सदरच्या चौकशीत मोठे काळेबेरे दिसून आल्यानंतर या समितीने आपल्या अहवालात संबंधित लोकांची एसीबीमार्फत म्हणजेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे म्हटले. त्यानुसार आता या अधिकार्‍यांची एसीबीमार्फत चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येते. 
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल