ताज्या बातम्या

रिपोर्टरच्या टी-१० नंतर यंदा  ‘रिपोर्टर आरपीएल २०-२०’ क्रिकेट संघांनी १ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी 

रिपोर्टरच्या टी-१० नंतर यंदा 
‘रिपोर्टर आरपीएल २०-२०’
क्रिकेट संघांनी १ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी 
बीड (रिपोर्टर):- रिपोर्टर टी १० च्या अभूतपूर्व यशानंतर या वर्षी सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीने ‘रिपोर्टर प्रीमीअर लिग २०-२० चे आयोजन करण्यात आले असून आरपीएलचा शुभारंभ १५ फेब्रुवारीपासून होत आहे. त्यापूर्वी १ फेब्रुवारी २०२० पर्यंत आरपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडुंनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी करण्याबाबत मोबाईल क्र. ७५०७८२२८४० (शेख फैसल) यांच्याशी संपर्क साधावा. 
   बीड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडुंना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी हा प्रांजळ हेतु ठेवून सायं. दैनिक बीड रिपोर्टरने गेल्या वर्षीपासून बीडमध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू केले आहे. गेल्या वर्षी रिपोर्टर टी-१० ला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यासह परराज्यातून अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले. त्यानंतर यावर्षी रिपोर्टरने ‘रिपोर्टर प्रीमीअर लिग ट्वेंटी-ट्वेंटीेचे आयोजन केले आहे. १५ फेब्रुवारीपासून श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी १ फेब्रुवारी २०२० पर्यंत खेळाडुंनी नाव नोंदणी करावयाची आहे. १ फेब्रुवारी ही शेवटची तारीख असून नाव नोंदणी करण्यासाठी शेख फैसल (मो. क्र. ७५०७८२२८४०) यांच्याशी संपर्क साधावा. बीडमध्ये क्रिकेट खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना चांगली संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून रिपोर्टर प्रीमीअर लिगचे आयोजन करत आहे, तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल