ताज्या बातम्या

महाराष्ट्रात मनसेचा रंग बदलला ‘नवा झेंडा नवा अजेंडा’ शॅडो मंत्रीमंडळ 

महाराष्ट्रात मनसेचा रंग बदलला
‘नवा झेंडा नवा अजेंडा’ शॅडो मंत्रीमंडळ 
मुंबई (रिपोर्टर):- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. त्याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसून येत असून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पूर्णत: रंग बदलून भगव्या रंगात राजमुद्रा असलेल्या ध्वजाचे अनावरण केले. नवा अजेंडा घेत व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवली अन् हिंदुत्वाचा अजेंडा उचलला. दुसरीकडे शॅडो मंत्रिमंडळ तयार करून विद्यमान सरकारवर लक्ष ठेवण्याचीही घोषणा केली. सायंकाळी आयोजीत महाअधिवेशनाला राज ठाकरे संबोधित करणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
   शिवसेनेला पाण्यात पाहणारे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची रणनीती आज महाअधिवेशनाच्या निमित्ताने ठरवण्यास सुरुवात केली. शिवसेनेने तिकडे राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन केल्यानंतर मनसेने इकडे भाजपसोबत जवळीकता वाढवली. आज महाअधिवेशनाच्या निमित्ताने ‘नवा झेंडा नवा अजेंडा’ चा नारा देत मनसेने अनेक बदल करून घेतले आहे. आज सकाळी अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचे अनावरण केले. मनसेच्या नव्या झेंड्यात भगव्या रंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वज यापुढे मनसेचा राहणार असल्याचे सांगितले. मनसे स्थापनेनंतर तब्बल १४ वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदलले आहेत. या आधीच्या झेंड्यात चार रंग होते, मध्यभागी भगवा रंग अधिक प्रमाणात होता मात्र आता पूर्ण भगवा ध्वज समोर आणला आहे. मनसेच्या व्यासपीठावर आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा दिसून आली त्यामुळे मनसे प्रखर हिंदूत्वाकडे वाटचाल करणार हे स्पष्ट झाले. त्याचबरोबर राज यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचीही लॉंचिंग करण्यात आली असून त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी राज ठाकरे महाअधिवेशनाच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. राज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल