ताज्या बातम्या

विहिरीत सापडलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली एक अर्धनग्न तर दुसरा  पुर्ण नग्न होता मृतदेह, मोटारसायकलही विहिरीत टाकली घातपाताचा  संशय

विहिरीत सापडलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली
एक अर्धनग्न तर दुसरा 
पुर्ण नग्न होता मृतदेह, मोटारसायकलही विहिरीत टाकली
घातपाताचा
 संशय
बीड (रिपोर्टर):- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. हे मृतदेह आज सकाळी पोलिस प्रशासनाने बाहेर काढल्यानंतर या दोघांचीही ओळख पटली. एक बसस्टँडच्या पाठीमागील भागातील रहिवाशी आहे तर दुसरा शाहूनगर येथील गजानन कॉलनी भागातील असून एका मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते तर दुसरा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने हा प्रकार घातपाताचाच आहे, असा संशय बळावला आहे. या दोन्ही मृतदेहांचे जिल्हा रुग्णालयामध्ये आज दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेच्या टिमसह शहर पोलिस करत आहे. 
   फुलाईनगर भागात काळे यांची जमीन आहे. त्यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये काही लोकांना रात्री दुर्गंधी येत असल्याने विहिरीत डोकावून पाहितले असता पाण्यात तरंगताना दोन मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती बीड शहर पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आज सकाळी अग्निशामक आणि तेथील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले.  सकाळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून एकाचे नाव आकाश श्रीकृष्ण हरकाळे ( वय २० वर्षे, रा. गजानन कॉलनी शाहूनगर)  व दुसरा कर्नलसिंग हिरासिंग शिकलकर (वय १९ वर्षे, रा. बसस्टँडच्या मागे) अशी या दोघांची नावे आहेत. यामध्ये शिकलकर याच्या अंगावर कपडे नव्हते तर हरकाळे हा फक्त अंडरवेअर आणि बनियानवरच आढळून आला. मृतदेहासोबत विहिरीत मोटारसायकलही (क्र. एम.एच. २३ यू. ३७८८) आढळून आली. या दोन्ही तरुणांचा घातपात केला असल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान या दोघांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचेही पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सदरील हा प्रकार कुठल्या कारणावरून घडला याचा अधिक तपास बीड शहर पोलिस तपास करत आहेत. हे दोघे १६ जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात  आले आहे. या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


कर्नलसिंगला १६ तारखेला आला होता फोन
बसस्टँड पाठिमागे राहत असलेल्या कर्नलसिंग याला १६ जानेवारीच्या साडेपाच वाजता अज्ञाताचा फोन आला होता. फोन आल्यानंतर तो समोरच्याला म्हणाला होता, मी आलो पाच मिनिटात, तो जो गेला तो परतच आला नसल्याचे त्याच्या घरच्या लोकांनी सांगितले. त्याल आलेला फोन नेमका कोणाचा होता? याचा तपास पोलिस प्रशासन करत आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल