ताज्या बातम्या

एनआरसी व सीएए विरूद्ध जिल्ह्यात असंतोष

एनआरसी व सीएए विरूद्ध जिल्ह्यात असंतोष
सीएए,एनआरसी विरोधात
आष्टी शहर कडकीत बंद
आष्टी (रिपोर्टर):- नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदच्या केलेल्या घोषणेला आष्टी शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला 
देशात एनआरसी आणि सीएएAA विरोधात अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचे वातावरण तयार झाले आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आष्टी शहरातील स्वतावून व्यापारी,व्यावसायिकांनी बंदला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत शहराच्या बाजारपेठेतील सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शांततेत बंद ठेवून आष्टी शहर कडकडीत बंद पाळण्यात आले.
---
वडवणी बंद

वडवणी (रिपोर्टर):- केंद्र सरकारने सीएए,एनआरसी लागू केलेला कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीने बंद पुकारला होता.याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत व्यापार्यांनी शंभर टक्के बाजार पेठ कडकडीत बंद ठेवली असुन याबाबत निषेध रँली काढण्यात येणार होती परंतु या रँलीला पोलीसांनी परवानगी नाकारली असल्याने बंद कार्यकर्त्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.
सीएए,एनआरसी कायदा हा देशात राहणार्या वंचित घटकांवर अन्याय करणारा आहे.हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी आज वडवणी शहराची बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी एकञ जमले.या बंदाला पुरोगामी समविचारी पक्षाचे सर्व पदाधिकार्यांनी पाठिंबा देण्यासाठी याच ठिकाणी एकञ आले.डॉ.आंबेडकर यांच्या चौकाला आभिवादन करुन बंदाचे आव्हान व निषेध रँली काढण्यात आली परंतु या रँलीला वडवणी पोलीसांनी परवानगी नाकारली  असल्याने पदाधिकार्यांमधून संताप व्यक्त केला जात असुन रँलीला परवानगी देणार या भुमिकेवर ठाम राहिल्याने समविचारी पक्षाच्या पदाधिकार्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. वडवणी येथील व्यापार्यांनी शंभर टक्के बाजार पेठ बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे.

एपीआय टाक यांची बदली करण्यासाठी मंत्री पवार,
मुंडे यांची भेट घेऊन तक्रार करणार-सतिश बडे
सर्व व्यापार्यांनी शहर बंद ठेवले होते.परंतु सर्व पदाधिकार्यांनी निषेध रँली काढण्यात येणार होती.म्हणुन आम्ही सर्व जण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एकञ येऊन चौकाला आभिवादन करुन बंदाचे आव्हान करुन कायदा रद्द करण्यात यावा अशी प्रकारणाची घोषणा देण्यात येणार होत्या म्हणुन लोकशाही आणि संविधानीक मार्गाने हि रँली काढण्यात येईल अशी माहिती पोलीसांना देण्यात आली होती.परंतु येथील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी ’चला सुट्टा येथून’ असं म्हणत खालची पातळी वरची भाषा वापरुन वर्तन केले असुन हे त्यांना न शोभणारे आहे.म्हणुन एपीआया टाक यांची बदली करण्यासाठी उद्या राज्याचे उपमुमंत्री आजित पवार व पालकमंञी धनंजय मुंडे यांची उद्या शिष्टमंडळ भेट घेऊन बदली करण्याची मागणी  करणार आहोत.अशी माहिती नगरसेवक सतिष बडे यांनी दै.रिपोर्टक्षशी बोलताना दिली.

गेवराई,शिरूर संमिश्र प्रतिसाद
एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीसह महाराष्ट्रातील ३५ विविध संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बीडसह जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरूर आणि गेवराई तालुक्यातील या तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.  एनआरसी गो बॅक म्हणत महाराष्ट्रात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बीडमध्येही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक तालुक्यात शाळा महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांनीही या बंदला पाठिंबा दिला. तर गेवराई आणि शिरूर तालुक्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

परळीच्या व्यापार्‍यांचा महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
परळी (रिपोर्टर):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बंद परळीला १०० % प्रतिसाद मिळाला सकाळपासुन व्यापार्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवुन पाठिंबा व्यक्त केला या बंदला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आज दि.२४ जानेवारी रोजी पुकारलेल्या परळी बंदमध्ये शहरातील सर्व व्यापार्यांनी व्यवहार बंद ठेवले होते.शाळा व महाविद्यालये बंद होती.सकाळी १० वा.रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन सीएए व एन आर सी च्या विरोधात भव्य रॅली काढण्यात आली.एकमिनार चौक,भवानी नगर,सुभाष चौक,रोडे चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर,नेहरु चौक,नाथ रोड,आण्णाभाऊ साठे मार्गे शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन नायब तहसिलदार सदानंद बरदाळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.या रॅलीमध्ये वंचित आघाडीचे गौतम साळवे, एन.के.सरवदे, मिलींद घाडगे, प्रसन्नजीत रोडे, संजय गवळी, अमोल बनसोडे,अनिल अवचार,शुभम इंगळे,भावेश कांबळे,राजेश सरवदे,धम्मा क्षीरसागर,बापु बनसोडे,सनी बनसोडे,प्रेम सरवदे,अमोल सावंत,बाळु किरवले,अमित सावंत,राजु शिंदे,रोहित आदोडे,सोनु कांबळे ,यांच्यासह मुफ्ती आशफाक,नगरसेवक अन्वर मिस्किन,अलिशर कुरेशी,मेहबूब कुरेशी,नवाबखान पठाण,गफार शेख,गफार अब्दुल बागवान,कादर कुरेशी,आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.या बंदला विविध ३६ संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला.

माजलगाव,सिरसाळा कडकडीत बंद
माजलगाव/सिरसाळा (रिपोर्टर):- देश उभारण्यासाठी आमच्या बाप दादांनी रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्हाला या देशाचे नागरिक असल्याचा पुरावा देण्याची गरज नाही असे म्हणत एनआरसी  व सीएए कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला ओ देत माजलगाव, सिरसाळा कडकडीत बंद पाळून नागरिकांनी संताप व्यक्त केला. 
केंद्र सरकारने नागरिकत्त्व कायदा नागरिकांवर बळजबरीने लादण्याचा खटाटोप सुुरू केला आहे. या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक अनेकांनी अनेक वेळा दिली. प्रत्येक वेळी या हाकेला ओ देत नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले. संपूर्ण महाराष्ट्राचा या कायद्याला विरोध असतांनाही केंद्र सरकार जबरदस्तीने नागरिकांवर हा कायदा लादत असल्याने आज पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी माजलगावमध्ये सर्व व्यापार्‍यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. तर सिरसाला येथील बाजारपेठेतही शुकशुकाट होता. सर्वस्तरातून या कायद्याचा निषेध होत आहे. 

केजला संमिश्र प्रतिसाद
केज (रिपोर्टर):- नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ बहुजन वंचित आघाडीने पुकारलेल्या बंदला बीड जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. केज येथील बहुतांश भागामध्ये व्यापार्‍यांनी बंद पाळला. केजच्या आजच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल असल्याचे दिसून आले. केज शहरातील काही भागातील नागरिकांनी स्वत:हून आपआपले व्यवहार बंद ठेवून आजच्या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. तर काही ठिकाणी व्यवहार सुरू होते. नागरिकत्व कायदा रद्द करावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. केंद्र शासनाने आणलेला हा कायदा जाचक असून तो रद्द करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. 
रॅली काढून पाटोदाकरांनी केला निषेध
पाटोदा (रिपोर्टर):- केंद्र सरकारने येवू घातलेल्या कायद्या विरोधात पाटोदाकरांनी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह ३५ संघटनेच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरातून निषेध रॅली काढत कडकडीत बंद पाळला. यावेळी शाळा, महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवला. 
वंचित बहुजन आघाडीचे सर्व्हेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ३५ संघटनांनी आज एनआरसी व सीएए कायद्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत अनेकांनी आपले छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेवून या कायद्याचा निषेध नोंदवत एनआरसी गो बॅकच्या घोषणा दिल्या. पाटोदाकरांनीही निषेध रॅली काढून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले. विद्यार्थ्यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला. 

माकप, डिवायएफआयचा बंदला पाठिंबा
बीड (रिपोर्टर):- वंचित बहुजन आघाडीसह ३५ संघटनांनी महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला बीडमध्ये माकपसह डिवायएफआय संघटनेने पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग नोंदवल्याचे माकप नेते मोहन जाधव यांनी सांगितले. 
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल