बीडमध्ये संमिश्र तर परळी, अंबाजोगाई, पात्रुड, चौसाळा कडकडीत बंद  पोलिसांची दडपशाही  बंदचे शांततेत आवाहन करणार्‍या  कार्यकर्त्यांना केली अटक

eReporter Web Team

बीडमध्ये संमिश्र तर परळी, अंबाजोगाई, पात्रुड, चौसाळा कडकडीत बंद 
पोलिसांची दडपशाही 
बंदचे शांततेत आवाहन करणार्‍या
 कार्यकर्त्यांना केली अटक
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून):- एनआरसी कायद्याच्या विरोधात विविध पक्ष संघटनेच्यावतीने आवाज उठवला जात आहे. देशात यासाठी आंदोलनही होत आहे. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. आजचा बंद बीड जिल्ह्यातही पाळण्यात आला. शहरातील कारंजा रोड, माळीवेस, सुभाष रोड, जालना रोड, टिळक रोड यासह आदी विभाग कडकडीत बंद होते. इतर विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील व्यापार्‍यांनी स्वत:हून आपले व्यवहार बंद ठेवले होते. तालुका पातळीवर अंबाजोगाई शहर कडकडीत बंद होते. परळी येथेही कडकडीत बंद होता. माजलगाव तालुक्यातील पात्रुड, बीड तालुक्यातील चौसाळा येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान बीड शहरातील काही कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली. हे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने बंद करत होते. तरीही पोलीसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. बहुजन वंचित आघाडीच्यावतीने बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये जिल्हाभरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. माजलगाव तालुक्यातील 
पात्रुड येते ही बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांनी या बंदला सहकार्य करत व्यवहार बंद ठेवले होते. बीड तालुक्यातील चौसाळा येथील व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. चौसाळा येथील व्यापार्‍यांनी आपले व्यवहार बंद ठेवावे असे आवाहन इरशाद कुरेशी, पवन कुचेकर, गणेश चव्हाण, प्रकाश ढोकणे, रोहित जावळे, फैय्याज मनियार, अजमेर मनियार, गणेश ढाकणे, अन्वर कुरेशी यांच्यासह आदींनी केले होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेकनूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुंडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बीड शहरातही माळीवेस, सुभाष रोड, कारंजा रोड, बशीरगंज चौक, जालना रोड यासह अन्य भागातील व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभाग घेवून आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. बीड शहरात काही ठिकाणी कडकडीत तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

बंदचे शांततेत आवाहन करणार्‍या
 कार्यकर्त्यांना केली अटक
बीड (रिपोर्टर):- एनआरसी, सीएए कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला ओ देत अनेकांनी आपले व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले, या वेळी वंचित बहुजन आघाडी, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून शांततेत बंदचे आवाहन करत असताना शिवाजीनगर पोलिसांनी दडपशाही करत ४० कार्यकर्त्यांना अटक केली.  पोलिसांची ही दडपशाही असल्याचे वंचित आघाडीचे अशोक हिंगे यांनी म्हटले आहे. 
     वंचित बहुजन आघाडीसह महाराष्ट्रातील ३५ संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला ओ देत बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीसह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी या कायद्याच्या निषेधार्थ रॅली काढून व्यापार्‍यांनी शांततेत बंद पाळून सहकार्य करावे, असे आवाहन केले. मात्र पोलिसांनी वंचित आघाडीचे अशोक हिंगे, एमआयएमचे शेख निजाम, बबन वडमारे,  पप्पू जोगदंड, किरण वाघमारे, प्रशांत बोराडे, अजय साबळे, मेजर वीर, सुभाष लोणके, पुष्पा तुरुकमारे यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना अटक केली. आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापार्‍यांना आवाहन करत होतो मात्र पोलिसांनी आम्हाला अटक करून दडपशाही केल्याचा आरोप वंचित आघाडीचे अशोक हिंगेंसह आदींनी केला आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like