ताज्या बातम्या

घरातले गुप्तधन काढतो म्हणाला, लाखोंचा गंडा घातला कुटुंबाला

आपला देश इतका प्रगतीपथावर गेला, मात्र अंधश्रद्धेचा बोलबाला अजूनही नाही थांबला. रुढी-परंपरा, अंधविश्वास, यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात काही लोक गुरफटले जातात. त्यांचे वर्षाकाठी लाखो रुपये अशा अंधश्रद्धेच्या नावावर खर्च होतात. अमुक केले की, अमुक होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी हे केले जाते. शत्रू नष्ट करण्यासाठी असे केले जाते. कोंबडा बकरा कापल्याने पुण्य मिळते.आम्ही तुमच्या मागची साडेसाती कायमची नष्ट करतो. मात्र यासाठी आमच्या देवाला ठराविक रकमेचा नैवेद्य लागतो. आम्ही ग्रहमानाची चाल बदलतो. आमचा शब्द कधीच व्हायला जात नसतो. आमचा शब्द म्हणजे शेवटचा ठरतो. आम्ही जनताजनार्दनावर आमची कृपादृष्टी सोडतो. अशी विविध प्रकारची  खोटी व लबाड आश्‍वासने देणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते त्यांच्या आमिष दाखवणाऱ्या शब्दांतून कित्येकांना आकर्षित करतात. विविध दुःखाचे निरसन होण्याच्या लालसेने अथवा संसारात भरभराटी होण्याच्या उद्देशाने कित्येक जण अशा लोकांच्या आहारी जातात. व स्वतःच्या संसारातला कष्टाचा आणि घामाचा पैसा अशा लबाडांची भरती करतात. जेव्हा एखाद्याच्या सारा संसार बरबाद होतो, तेव्हा हा बाबा स्वतःचे अंग काढून घेतो. जेव्हा जनतेत प्रचंड असा फसवेगिरी चा कल्लोळ माजतो, तेंव्हा चार चौघात फसवेगिरीच रहस्य उघडलं जातं. अशा विविध प्रकारचे आमिष दाखवून भोळ्या-भाबड्या जनतेला फसवलं जात. असे हे फसवेगिरी चे प्रकार आजही मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. असाच  चा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला.एकाच्या घरात गुप्त धन असल्याचा तिघाजणांनी दावा केला. वेळोवेळी तब्बल 2 लाख 35 हजारांचा एका घराला गंडा घातला. पहा कसा गुप्त धनाचा घाला झाला, जवळच असणारा पैसाही गेला. व त्यांच्या वाट्याला घरात दोन दगडाचा प्रसाद उरला. कशे एका परिवारास घरात  गुप्तधन असल्याचे अमिश दाखवले.अशी फसवेगिरी करणाऱ्या लबाडाच्या मुसक्या कशा आवळल्या वाचा सविस्तर क्राईम नामा मध्ये

 

 बीड शहरातील बसस्थानकापासून काही अंतरावर पूर्वेकडे पेठ बीड नावाचा एक मोठा विभाग आहे. याच पेठ बीड भागात हिरालाल चौक नावाचा मोठा गजबजलेल्या चौक आहे. सदर चौक अत्यंत वर्दळीचा असतो. या भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे साम्राज्य असते. व याच हिरालाल चौकात शेळके परिवाराचं कुटुंब वास्तव्यास होतं. राजेंद्र शेळके असे त्या कुटुंब प्रमुखाच नाव होतं. ते आपली पत्नी लता व मुलगा रुपेश असा त्यांचा परिवार हिरा लाल चौकात त्यांच्या मालकी हक्काच्या घरी राहत होते. राजेंद्र शेळके यांचाही बीड शहरात मोठा मित्रपरिवार व नागरी ओळख लोकांच्या परिचयाची झालेली होती. या राजेंद्र शेळके यांचा एक मित्र बीड शहरातील शुक्रवार पेठ मध्ये राहत होता. त्याचे नाव अन्वर शेख असे होते. अन्वर हा चतुर व चालाख बुद्धीचा होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी पैसा कमावण्याच्या, लबाडीपणाच्या,आणि फसवेगिरीच्या विविध योजना त्याच्या डोक्यात घुमत होत्या. अशीच जनतेतून पैसा कमवण्याची, आगळीवेगळी शक्कल त्याच्या मनात आली. आणि त्याने ती सत्यात उतरवली. आपला मित्र हिरालाल चौकात राहणारा राजेंद्र याच्याकडे राहण्यासाठी जुना वाडा आहे. आता आपल्या मनात घुमत असणारा प्रयोग राजेंद्र शेळके याच्यावरच करून पाहावा. असे त्याला वाटले. आणि तो लगेच त्या मोठ्या उपक्रमाच्या तयारीला लागला. दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी चा दिवस उजाडला. त्यादिवशी अन्वर याने राजेंद्र ची भेट घेतली. व काही तरी बहाणा करून तो राजेंद्र बरोबर त्याच्या घरी आला. संध्याकाळची वेळ झालेली होती. संध्याकाळचे सात वाजले होते. तेव्हा घरी राजेंद्र याची पत्नी लता शेळके या होत्या. त्या महिला बचत गटाच्या कामांसह पापड तयार करण्याचा व्यवसाय करत होत्या. या व्यवसायावरच त्यांची उपजीविका भागवत होती. अन्वर शेख थोडा वेळ त्यांच्या घरी बसला. व त्यानंतर अन्वर शेख याने शेळके यांच्या पत्नीला म्हणाला, मावशी तुम्ही कोणता व्यवसाय करतात! अशी त्यांना त्याने विचारणा केली. तेव्हा त्या महिलेने पापड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे उत्तर दिले. तेव्हा तो म्हणाला माझी व तुमच्या पतीची चांगलीच ओळख आहे. तुमचे पती माझे चांगले मित्र आहेत. असे बोलता बोलता त्याने स्वतःचा परिचय त्या महिलेला करून दिला. आणि म्हणाला मावशी हे तुमचे घर अत्यंत जुनी प्राचीन आहे. आणि तुमच्या घरात खात्रीशीर सोने असल्याचा त्याने दावा केला. तुमच्या घरात एवढे मोठे सोने आहे, मग तुम्ही असे खाकरा पापड तयार करून विकण्याचे काम कशाला करता. असा तो त्या महिलेसह त्यांच्या कुटुंबाला म्हणाला. पूर्वी जुन्या घरांमध्ये, वाड्यांमध्ये, खरोखर धनाचे हंडे सोने पैसे सापडत होते.त्यात व त्यांचे घर जुने होते. असू शकते आपल्याही घरात सोने, अशी लालसा त्या महिलेच्याही मनात निर्माण झाली. तेव्हा ती त्याला म्हणाली खरंच आमच्या घरात सोनं आहे का? त्याने सांगितले हो. हे खरे आहे तुमच्या घरात भरपूर प्रमाणात सोने आहे. मी सांगतो ते अगदी खरे आहे. आम्ही सत्य बोलतो. आमचा शब्द खरा ठरतो. पण माझी एक अट आहे, मी सांगेन तसे तुम्हाला करावे लागेल. पण ही गोष्ट कोठेही कोणाजवळ उघड करायची नाही. असे त्याने त्या पती-पत्नीला म्हटले. त्याच्या बोलण्यावर या पती-पत्नीचा चांगलाच विश्वास बसला. व त्याच्या होकाराला होकार देण्यास हे दोघेही तयार झाले. तेव्हा अन्‍वर म्हणाला, आमच्याकडे अशी पडकी वाडे व जुन्या घरातील कित्येक वर्षापूर्वीच्या रहस्याचे सोने, जुने धनाचे हंडे, यशस्वीपणे काढून देणारे दोन माणसे आहेत. तुम्ही जर हो म्हणत असाल तर, मी त्यांना आपल्या दोस्तान्या खातीर तुमच्या घरी घेऊन येतो. असे म्हणत तो अन्वर शेख त्यांच्या घरून त्यांना आमिष दाखवून निघून गेला. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी म्हणजे 15 नोव्हेंबर 2019 रोजी पुन्हा शेळके यांच्या घरी आला. येताना गुप्तधन काढून देणारे त्या दोन माणसांना सोबत घेऊन आलेला होता. त्यापैकी एक बीड शहरातील एम आय डिसी बायपास रस्त्यालगत राहणारा दिपक गायकवाड या नावाचा व्यक्ती होता. तर दुसरा विष्णू पवार हा बीड शहरातील रामनगर भागातील रहिवाशी होता. त्यांनी त्या दोन्ही सोबत आणलेल्या अनोळखी व्यक्तींचा अन्वर याने या दोघा पती-पत्नीला परिचय करून दिला. मी माझ्या सोबत आणले दोन्ही माणसे घरातील सोना काढण्यात खूप माहीर आहेत. ते तुम्हाला सोने काढून देतील. पण तुमच्याकडे या दोघांना मी आणल्याबद्दल त्यांना तुम्हाला 5000 रुपये द्यावे लागतील. व त्यापुढील  तुमची सर्व कामे आता मी पाहणार नाही. हे गायकवाड व पवार हे दोघे व्यक्तीच तुमची सर्व कामे करतील. असे उद्गार त्यांनी काढले. या पती-पत्नीला वाटले फक्त पाच हजारात घरातील गुप्तधन  आपल्याला मिळत आहे. पुढे त्याच धनाने आपण मालामाल होऊन जाऊ, अशे विचार त्यांच्या मनात आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने जवळ असणारे पाच हजार रुपये बाहेर काढले आणि अन्वर शेख च्या सोबत आलेल्या दीपक गायकवाड यांच्या स्वाधीन केले. त्यांचा हा प्रकार घडल्यानंतर तिथून तात्काळ तिघेही निघून गेले. पुन्हा दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी म्हणजे तब्बल दोन दिवसानंतरच गायकवाड पवार व शेख हे तिघेही विचारविनिमय करून शेळके यांच्या घरी पोहोचले. आणी म्हणाले आता आम्ही पुढच्या वेळेस आल्यानंतर, तुमच्या जागेत असणारे सोने खड्डा खोदून काढणार आहोत. पण यासाठी 25 हजार रुपये लागणार आहेत. जर धनाचा डबा काढायचा असेल, तर पंचवीस हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील. जर या तिघांना 25000 नाही म्हटलं तर पहिले पाच हजार गायब झाल्यासारखे दिसत होते. व 25 हजारकडे पहावे तर मिळणारा धनाचा डबाही मिळणार नाही. असे लक्षात आल्यावर त्यांच्या तिघांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या महिलेने पुन्हा त्यांना पंचवीस हजार रुपये रोख या तिघांच्या हवाली केले. त्यानंतर दिनांक 20 नोव्हेंबर 2019 रोजी दिपक गायकवाड हा शेळके यांच्या घरी आला. गुप्तधन काढण्याचे नाटक दाखवण्यासाठी त्यांच्या अंगणात थोडा खड्डा खोदला. खड्डा खोदल्यानंतर या जागेत असणारे सोने बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक डबा लागेल. तो एक डब्बा तुम्ही मला द्या, मग मी त्या डब्यात सोने घेऊन येतो. असा तो त्यांना म्हणाला. तेव्हा त्या महिलेने फिट्ट झाकण असणारा एक डब्बा त्याच्याकडे आणून दिला. तो डब्बा जर्मनचा होता. डबा हातात घेतला व खंड्या जवळ गेला, त्या महिलेचं  त्या खड्याकडे  लक्षच होतं. तेव्हा तिची नजर हटवण्यासाठी तो त्या महिलेला म्हणाला, हा डबा बाहेर खड्ड्यातून काढल्यानंतर त्याला काही दिवस देवघरात ठेवावे लागते. यासाठी तुम्ही देवघराकडे जा. आणि डब्बा ठेवण्यासाठी थोडी जागा करा. तेव्हा ती महिला देवघराकडे जागा करण्यासाठी गेली, तेव्हा त्याने आजूबाजूचा सारा वारा पाहिला, आपल्याला कोणी पाहत आहे का हे अगोदर त्याने  पाहिले. व त्याच खड्ड्यातील दोन दगड त्याने उचलले. आणि डब्यात टाकले. तोपर्यंत त्या महिलेने देव्हाऱ्याजवळ डबा ठेवण्यासाठी जागा केलेली होती. हा त्या महिलेकडे देव्हाऱ्याच्या दिशेने गेला. तेव्हा ती महिला खड्या कडच्या असणाऱ्या डब्याकडे येऊ लागली तेवढ्यात तो म्हणाला की, तुम्ही इथेच थांबा सोन्याने भरलेल्या डब्बा मी तुमच्याकडे घेऊन येतो. असे म्हणत त्या खड्याकडे तो गेला. थोडा वेळ त्याने तिकडेच व्यतीत केला. व नंतर काही वेळाने तो डब्बा हातात घेऊन तिच्याकडे आला. त्याला फिट्ट झाकण लावले होते. त्याने तो डबा त्या महिलेच्या हातात दिला. आणि म्हणाला यामध्ये खड्ड्यातून काढलेले सोने ठेवले आहे. त्याने तो डबा देवघरात तयार केलेल्या जागेत ठेवण्यास सांगितलं. आणि म्हणाला यानंतर माझी एक अट आहे. त्यांनी सांगितले कोणती अट. तेव्हा तो म्हणाला, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत डबा उघडायचा नाही. असा आदेश त्याने त्या महिलेला दिला. जर का तुम्ही हा डबा उघडला तर तुमचे धड का बाजूला व मुंडके एका बाजूला तुटून पडेल. अशी रदय हेलावणारी भयानक भीती त्या लबाडयांनी त्या महिलेला दिली. व पुन्हा त्या डब्यात आतील सोन्याचा कोळसा होईल. यासाठी तुम्ही हा डब्बा मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उघडायचं नाही. असे त्याने सांगितले. व जाताना शेळके कुटुंबास म्हणाला, आता मी तुमचे कोट्यावधी रुपयाची सोन्याचे काम केलेले आहे. तुमचे हे काम परिपूर्ण यशस्वी मी केलेले आहे. आता जाता वेळेस तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये द्या असे तो त्यांना म्हणाला. त्यानंतर त्या पती-पत्नीस वाटले, एव्हडे मोठे यांनी आपल्याला सोने काढून दिल्याने आता आपला करोडचा फायदा झालेला आहे. मग जाता जाता फक्त पाच हजारासाठी कशाला त्यांना नाराज करायचे असे त्यांना वाटले. तेव्हा त्यांनी डब्यात सोने निघण्याच्या अपेक्षेने सढळ हाताने पुन्हा त्यास पाच हजार रुपये देऊन टाकले. व पैसे देऊन तो तिथून निघून गेला.

  डबे ठेवलेले सोने कधी पहावे व कधी नाही, याची त्याच्या मनात उत्सुकता आलेली होती. कधी डबा खोलून पाहू व कधी नाही असे त्यांना झाले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी दिपक पुन्हा त्यांच्या घरी फिरकला. तेव्हा यांनी डबा कधी उघडायचा अशी तात्काळ विचारणा केली. तेव्हा आता त्याने वेगळीच शक्कल त्यांना सांगितलली. तुम्ही जरा थांबा डब्बा उघडण्याची जास्तच घाई करू नका. कारण त्याच्यात ठेवलेले सोनी अत्यंत गरम आवस्थेत असते. याला जरा थंड तरी होऊ द्या. जर तुम्ही डबा उघडण्याची घाई केली तर तुमचे मुंडके एका बाजूला व धड एका बाजूला वेगवेगळे होईल. असा भयानक इशारा देऊन तो तिथून निघून गेला. त्यानंतर बापरे डब्बा खोलल्याने मुंडके तुटेल त्यापेक्षा अजून काही कालावधी डब्बा न उघडलेले बरे असे त्यांना वाटले. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत शांत राहिलेलेच बरे असे म्हणत ते गप्प बसले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दीपक पुन्हा शेळके यांच्या घरी आला. आता डब्याचं झाकण उघडण्यासाठी योग्य मुहूर्त व कालावधी तयार झालेला आहे.मात्र आता आपल्याला झाकण काढायचे आहे पण ते सहजासहजी काढता येणार नाही. तेव्हा ते म्हटले का?  कारण याचे झाकण उघडण्यासाठी मोठा विधी करावा लागतो. तो विधि काय साधा सोपा नाही. तो अत्यंत भयानक असा मोठा विधी असतो. तो करण्यासाठी तुम्हाला 75 हजार रुपये खर्च येईल व तो विधी केला तरच आपल्याला झाकण उघडता येईल. अन्यथा झाकण उघडता येणार नाही. यासाठी तुम्ही 75 हजार रुपये द्या अशी त्याने त्यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी शेळके परिवाराची अवस्था अडकीत्यात त्यात सुपारी अडकल्यासारखी झालेली होती. इकडे पाहिले तर आड, व तिकडे पाहिले तर विहीर अशी अवस्था त्यांची बनलेली होती.ना धरता येईना व सोडता येईना अशी परिस्थिती त्यांची निर्माण झाली. 75000 नाही म्हणावं तर आतापर्यंत दिलेले पैसे व मिळणारे सोने सगळ्यावर पाणी फिरेल अशा परिस्थितीत बनलेली होती. दगडावाणी गप्प राहता काहीच न बोलता चुपचाप जवळचे 75 हजार रुपये काढले व त्यांच्या स्वाधीन केले.आणि पैसे घेऊन तो तेथून  निघून गेला व पुन्हा दोन-तीन दिवसांनी त्यांच्या घरी फिरकला. तेव्हा यांनी अजून कशातच काही नसताना इतके पैसे दिले होते. यासाठी त्यांच्या जिवांना मुंगळे सुटले होते. त्यांनी आल्या आल्या त्याला कधी सोने काढून देता अशी विचारणा केली असता, तो म्हणाला आपला हा विधी मोठा आहे, यासाठी अजून 25 हजाराची कमतरता भासली आहे आपण यास एवढे पैसे दिले मग आता शेवटच्या टप्प्यावर 25000 याकडेच काय बघायचे, त्यानंतर तात्काळ लवकरात लवकर सोने काढून देईल अशा आशेने त्यांनी पुन्हा त्यास पंचवीस हजार रुपये दिले. पैसे घेऊन गेल्यानंतर बरेच दिवस झाले. दिपकराव काय शेळके यांच्या घराकडे फिरकलेच नाही. त्यामुळे बरेच दिवस झाले डबा उघडून पाहण्याची त्यांना मोठे आस लागलेली होती. तेव्हा त्यांनी दीपक च्या मोबाईलवर फोन केला. डब्बा उघडावे का? तुमचा तिकडे  विधी झालेला आहे का? अशी विचारणा केली असता, तो म्हणाला थांबा मी घरी येतो, मग आपण डब्याचे झाकण उघडून पाहू.असे त्याने त्यांना सांगितले. मात्र तो घरी येतो म्हणाला पण घरी आलाच नाही. हा घरी का आला नाही. म्हणून हे त्याचा फोन लावून विचारणा करत होते. तेव्हा आज येतो, उद्या येतो, अशी उत्तरे देत तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा बरेच फोन केल्यानंतर तो एक दिवस अचानक त्यांच्या घरी येऊन ठेपला. तेव्हा त्यांनी आता तरी डबा उघडावे का? असे विचारले असता, त्या सोन्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा धातू आणावा लागेल. यासाठी एक लाख रुपयांची गरज लागत आहे. असे त्यांनी पुन्हा एका लाखाची मागणी केली. हा व्यक्ती वारंवार पैसे मागतच आहे. हे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर ही बाब जरा त्या महिलेला खटकली. तेव्हा तिने त्याच्याशी थोडा वाद घातला. तेव्हा तो म्हणाला देव्हाऱ्या खाली ठेवलेल्या त्या डब्यात तुमचे एक दोन कोटीचे सोने ठेवले आहे. ते तुम्हाला पाहिजेत का नाही, का त्याचा कोळसा करू! असा स्पष्ट त्यांना म्हणाला. असा हा त्यांचा वाद बराच वेळ सुरू राहिला बऱ्याच वेळा असा त्यांचा  वाद झाल्यानंतर त्या शेळके परिवाराणे पुन्हा त्यास एक लाख रुपये रोख दिले. व तो एक लाख रुपये घेऊन फरार झाला. व पुन्हा त्यांच्या घरी फिरकलाच नाही. म्हणून यांनी वारावर त्याच्या मोबाईल वर फोन लावून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, व घरातील सोन्याबद्दल विचारणा केली असता, आता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला होता. आज येतो, उद्या येतो, असे म्हणत तो टाळाटाळ करत तब्बल त्याने 25 दिवस त्यांना परेशान केले. पैसे घेऊन गायब झाला, पुन्हा यांचा फोन उचलण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून आपली मोठी फसवणूक झाल्याचा त्यांना अंदाज लागला. त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी सकाळचे अकरा वाजले होते. आता हा फसवणुकीचा प्रकार दिसत आहे हे त्यांच्या चांगलेच लक्षात आले. तेव्हा आता मुंडके तुटू अथवा धड बाजूला पडो, मात्र डब्याचे झाकण उघडून पाहायचेच असे म्हणत, मोठी हिम्मत करून त्यांनी देव्हाऱ्याच्या खाली ठेवलेला डबा बाहेर काढला. व मोठ्या हिमतीने त्या डब्याचे झाकण उघडून पाहिले असता, त्या डब्यात त्यांनी ठेवलेली दोन दगडे त्यांना दिसून आले. तेव्हा आता परिपूर्ण खात्रीशीर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात सोन्याचे आमिष दाखवून दोन लाख 35 हजार रुपयाची आपल्याकडून त्यांनी वसुली केली व आपळ विश्वासघात केल्याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा त्यांनी तात्काळ बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे गाठले. दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी 02:54 मिनिटांनी फिर्यादी लता राजेंद्र शेळके वय 38 वर्षे धंदा घरकाम रा. हिरालाल चौक बीड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 314/ 2019 नुसार अन्वर शेख रा. शुक्रवार पेठ बीड, दीपक राजाभाऊ गायकवाड रा. एमआयडीसी बीड, विष्णू आसाराम पवार रा. रामनगर बीड या तिघा विरोधात कलम 420, 34 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्याकडे सोपवला.

    तक्रार दाखल झाल्यानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख गजानन जाधव हे आपल्या पथका समवेत शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत होते. तेव्हा गजानन जाधव यांना गुप्तचरमार्फत एक खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती हिरालाल चौकातील या शेळके परिवाराची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपी संबंधी होती. आरोपी दीपक गायकवाड हा बायपास रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल शेजारी बसलेला होता. सकाळची वेळ होती. दरोडा प्रतिबंधक पथक आपल्या फौजफाट्यासह त्याच्यासमोर जाऊन हजर झाले. व त्याच्या मुसक्या आवळून त्याला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. तर दुसरा आरोपी विष्णू पवार याचाही पथक प्रमुख जाधव यांनी कानोसा घेतला. तेव्हा बीड शहरातील रामनगर येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची खात्री गुप्तचर मार्फत जाधव यांना मिळाली. गजानन जाधव यांच्यासोबत अभिमन्यू अवताडे, मुन्ना वाघ, सुबराव जोगदंड, संतोष जायभाय, महेश भागवत, राहुल शिंदे, अशोक दुबाले, महेश चव्हाण, यांनी आरोपी विष्णू पवार यास रामनगर येथील त्याच्या राहत्या करून ताब्यात घेतले. व त्यास पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. तर तिसरा आरोपी अन्वर शेख या दोघांना अटक झाल्याची माहिती मिळताच फरार झालेला होता. त्यानंतर पेठ बीड ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पठाण यांनी तपासाची चक्रे गतिमान केली.विविध ठिकाणी गुप्तचरांच्या नेमणुका केल्या. तेवढ्यात आरोपी हा हा तेलगाव नाक्यावर असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तेलगाव नाक्यावरून त्यास ताब्यात घेतले. व त्याच्या मुसक्या आवळत त्याला पेठ बीड पोलीस  ठाण्यात आणले. व त्या तिघांचीही कसून चौकशी केली असता, स्वतःच्या फायद्यासाठी, त्यांनी हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

      सदर कामगिरी बीड जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली, दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख गजानन जाधव, पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक पठाण, तसेच दरोडा पथकातील कर्मचारी अभिमन्यू अवताडे, मुन्ना वाघ, सुबराव जोगदंड, संतोष जायभाय, महेश भागवत, राहुल शिंदे, अशोक दुबाले, महेश चव्हाण, यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली

         संकलन 
    प्रा सुनिल जाधव 
 उपसंपादक  दै बीड रिपोर्टर 
    मो ९८२२६३७९२८

अधिक माहिती: prof.sunil jadhav beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल