ताज्या बातम्या

धनंजय अस्त्राने बीड भाजप पुन्हा घायाळ राष्ट्रवादीचे चारही सभापती बिनविरोध महिला व बालकल्याण यशोदा जाधवांकडे तर समाजकल्याण आबुज यांच्याकडे, अन्य खात्यांचे वाटप जि.प.च्या पहिल्या बैठकीत

धनंजय अस्त्राने बीड भाजप पुन्हा घायाळ
राष्ट्रवादीचे चारही सभापती बिनविरोध
महिला व बालकल्याण यशोदा जाधवांकडे तर समाजकल्याण आबुज यांच्याकडे, अन्य खात्यांचे वाटप जि.प.च्या पहिल्या बैठकीत
बीड (रिपोर्टर) तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या ताब्यातून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तब्बल ३२ मतांनी आपल्या नेतृत्वात ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही बाजी मारली असून निवडणूक लढवण्यासाठी भाजपाने उमेदवार्‍या दाखल केल्या खर्‍या परंतु धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात मोठं संख्याबळ असल्याने ऐनवेळेस उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीचे चारही सभापती बिनविरोध निवडून आले. धनंजय मुंडे रात्रीपासून या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. रात्री त्यांनी औरंगाबादेत जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली आणि आज सकाळी ते बीडमध्ये डेरेदाखल झाले. महिला व बालकल्याण सभापतीपद यशोदाबाई जाधव तर समाजकल्याण खाते कल्याण आबुज यांच्याकडे गेले असून अन्य खात्यांचे वाटप जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. 
   जिल्हा परिषदेच्या चार सभापतीपदांची निवड आज करण्यात आली. भाजपाने सदरची निवडणूक लढवण्याचे मनसुबे बांधल्याचे लक्षात आल्यानंतर ना. धनंजय मुंडे हे रात्रीपासून या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले. रात्री औरंगाबादेत आपल्या जिल्हा परिषद सदस्यांशी त्यांनी चर्चा केली. आज सकाळी बीडमध्ये डेरेदाखल होत नव्या चेहर्‍यांना संधी देत धनंजय मुंडेंनी आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली. आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जयसिंह सोळंके, यशोदाबाई जाधव, सविता मस्के, कल्याण आबूज यांच्या नावावर सभापतीपदासाठी एकमत झाले. दुपारी दोन वाजता त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याच दरम्यान भाजपाकडून अशोक लोढा, अविनाश मोरे, सविता बडे, भागवत नेटके यांनी उमेदवारी दाखल केली तर शोभा दरेकर यांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केली होती. ऐनवेळेस दरेकरांसह भाजपाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयसिंह सोळंके, यशोदाबाई जाधव, सविता मस्के, कल्याण आबुज हे बिनविरोध निवडून आले. यामध्ये यशोदाबाई जाधव यांच्याकडे महिला व बालकल्याण तर कल्याण आबुज यांच्याकडे समाजकल्याण खाते आले असून उर्वरित खात्यांचे वाटप जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीत होणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. ना. धनंजय मुंडेंनी सभापतीपदाच्या निवडणुकीत नवख्या चेहर्‍यांना संधी देत आपली राजकीय कार्यप्रणाली आणि हातोटी दाखवून देत तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जबरदस्त धक्का दिला. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल