नेत्यांच्या गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्र,  वेबसाईट, सोशल मीडियावर प्रसिद्ध करा  सुप्रीम कोर्टाचे राजकीय पक्षांना आदे

eReporter Web Team

नेत्यांच्या गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्र, 
वेबसाईट, सोशल मीडियावर प्रसिद्ध करा 
सुप्रीम कोर्टाचे राजकीय पक्षांना आदेश
नवी दिल्ली (वृत्तसेवा):- नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाईटवर प्रकाशित करा, असे महत्त्वाचे आदेश सुप्रिम कोर्टाचे देशातील सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राजकारणाचे गुन्हेगारीचा विचार करता सुप्रीम कोर्टाचे आदेश अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता सर्व राजकीय पक्षांना ही माहिती आपल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.
   हा आदेश देताना सुप्रीम कोर्टाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने देशातील राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांवरी गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाइट्स, फेसबुक, ट्विटर अशा सर्व माध्यमांद्वारे प्रसिद्ध करून त्याबाबत जनतेला माहिती द्यावी असे आदेश दिले आहेत. ’पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना उमेदवार्‍या का देतात?’ राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यासारखी राजकीय पक्षांची अशी कोणती मजबुरी असते, असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला आहे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like