ताज्या बातम्या

जवळ्याजवळ माजलगाव  बॅक वॉटरची पाईपलाईन फुटली

जवळ्याजवळ माजलगाव 
बॅक वॉटरची पाईपलाईन फुटली
शहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकललाबीड

(रिपोर्टर):- माजलगाव बॅक वॉटरची पाईपलाईन जवजळ्या जवळ फुटल्याने सदरील पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे बीड शहराला आजच्या ऐवजी उद्या पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तशी नोंद शहरवासियारंनी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांसह पाणीपुरवठा अभियंत्यांनी केले आहे. 
   माजलगाव बॅक वॉटरची जलवाहिनी जवळा गावाजवळ फुटलेली आहे. पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय आला, पाईपलाईन जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बीड शहरातील धानोरा रोड पाणीपुरवठा केेंद्र गांधीनगर विभाग व नवीन हद्दीलगत भागातील उद्या शहरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाने उशिरा होईल, तशी नोंद संबंधित शहरवासियांनी घ्यावी, असे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता, पाणीपुरवठा सभापती रविंद्र कदम यांनी केले आहे. 

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल