ताज्या बातम्या

शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळला भेसळयुक्त खत प्रकरणात  नवा भारत कंपनी विरुद्ध  गुन्हा दाखल

शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळला
भेसळयुक्त खत प्रकरणात  नवा भारत कंपनी विरुद्ध  गुन्हा दाखल
माजलगाव (रिपोर्टर)- शासनाच्या नियमाप्रमाणे कुठलाही विक्रीचा परवाना नसताना हैदराबाद येथील नवा भारत  फर्टीलायझर कंपनी ने भेसळयुक्त खताची विक्री करून शेतकर्‍याची फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यातील रामनगर छोटेवाडी,मोगरा येथे उघडकीस आला होता याची तक्रार काही पत्रकार व शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे दिल्यानंतर चौकशीचे चक्रे गतिमान होऊन अखेर कृषी अधिकारी पंचायत समिती माजलगाव यांच्या तक्रारीवरून संबंधित कपणीविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसात विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळून लावण्यात कृषी विभागाला यश आले आहे.     
   आंध्र प्रदेश मधील हैदराबाद येथील नवा भारत फर्टीलायझर या कंपनीकडून शेतकर्‍यांना विजया ग्रमिन हा बोगस रसायनिक खत विकून फसवणूक करण्यात येत असल्याची घटना तालुक्यातील रामनगर तांडा मोगरा येथील शेतकरी अंकुश चव्हाण, दिलीप राठोड, रोहिदास चव्हाण आदी शेतकर्‍यांनी उघडकीस आणली असून सदर खतांमध्ये दगडी खड्याची मोठ्या प्रमाणात भेसळ असून कंपनीने सुशिक्षित बेरोजगारांना ज्यादा कमिशन चे आमिष दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहेत. संबंधित कंपनीवर प्रशासनाने कारवाई करून बोगस खताची विक्री बंद करून बोगस खत जप्त करावा व शेतकर्‍यांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यामुळे संबंधित कृषी विभागाला केंद्रेकर यांनी चौकशीचे आदेश दिल्याने चौकशीचे चक्रे गतिमान झाली आणि गुणवत्ता नियंत्रक व कृषी विभागाची टीम माजलगाव ला पोहचली असता मंगळवारी सदरील खताची नमुने घेऊन प्रयोग शाळेत पाठवले असल्याचे समजते सदरील कंपनीकडे उत्पादन आणि विक्री करण्याचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले तसेच अनेक चुकीचे प्रकार समोर आल्याने ,आणि यातून शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्याने तक्रारीची गंभीर दखल घेत पंचायत समिती माजलगाव चे कृषी अधिकारी हजारे यांनी संबंधित कंपनी विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळून लावला आहे,

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल