ताज्या बातम्या

रंजल्या-गांजलेल्यांचं काम पंडित कुटुंबिय करतय -ना.राजेश टोपे राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यातील मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

रंजल्या-गांजलेल्यांचं काम पंडित कुटुंबिय करतय -ना.राजेश टोपे
राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यातील मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
गेवराई (रिपोर्टर):- जे का रंगले गांजले । त्याशी  म्हणे जो आपुले ! तो चि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा । या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा जपत आणि या विचाराला पूरक असे काम अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित करत आहेत. जोपर्यंत माणूस चांगला विचार करत नाही तोपर्यंत अशा शिबिरासारखे काम उभे राहू शकत नाही, तुमच्या आरोग्याचा विचार करुन तुम्हाला या शिबिराच्या माध्यमातून दुरुस्त करुन पाठवण्याचा निर्धार विजयसिंह पंडित यांनी केला असून आपण त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश भैय्या टोपे  यांनी केले.  राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने आयोजित केलेल्या शिवसप्ताहात आज मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
   विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयात मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेशभैय्या टोपे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजक माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, डॉ. कु. पद्मांजली पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, सभापती जगन पाटील काळे, अंबडचे उपसभापती बाळासाहेब नरवडे, गौतम खटोड, जालिंदर पिसाळ, डॉ. सुहास घाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना ना. टोपे पुढे म्हणाले की, 
आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याची काळजी घेत नाही, ग्रामीण भागातील  महिलांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम आमचा आरोग्य विभाग करत आहे, त्यासाठी महिलांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी केली पाहिजे. वर्षातून किमान एकदा तरी आपण रक्त तपासणी करुन आपला हिमोग्लोबिन तपासला पाहिजे, त्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालयात रक्ततपासणी मोफत करण्याची सुविधा असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत आपल्या सरकारने काम करण्याचे ठरवले असून शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील उपकेंद्राला आरोग्य वर्धिनीचा दर्जा देणार असून कँन्सर, ह्रदयरोगाच्या संदर्भात ग्रामीण रुग्णालयात केमोथेरपी, रेडिओ ग्राफी, ई. सी.जी. च्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुविधा येणार्‍या एक एप्रिल पासून तालुक्यातील सर्व रुग्णालयात तसेच जिथे शासकीय रुग्णालय नसतील अथवा व्यवस्था नसेल तिथे खाजगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या चांगल्या योजना लोकांना समजावून सांगण्यासाठी अशा शिबिराची गरज असून विजयसिंह पंडित यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या काळजी साठी हे शिबिर आयोजित केले असून हे अतिशय चांगले काम आहे, असे काम आपणही केले पाहिजे ही प्रेरणा घेऊन मी  जातो असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात म्हणाले की,  या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करून त्यांना दिलासा देण्यात येणार आहे. रोग निदानानंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना संपर्क करून तारीख कळवली जाईल.  त्यांची सर्व व्यवस्था आरोग्य विभागाकडून केली जाईल. विजयसिंह पंडित यांनी या शिबिराच्या माध्यमातून चांगले काम करण्याची संधी दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आपल्या प्रस्तावित भाषणात बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, लोकांना आधार आणि दिलासा देण्याचे काम या शिबिरातून केले आहे.  ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांना औषधोपचाराची गरज आहे, ही जाणीव ओळखून आम्ही या शिबिराचे आयोजन केले असून गरजू रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून तपासून वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याचे काम केल्याचे समाधान आहे असेही ते म्हणाले. आपली सत्ता आली असल्यामुळे लोकांना फायदा व्हावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने शिबिराच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले,  त्याला आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले. सर्वांना एकत्र करून हे शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. या शिबिरात रोगनिदान नंतर त्यांना औषध उपचार देणे तसेच प्रसंगी शस्त्रक्रिया करुन गेवराई विधानसभा मतदारसंघ शस्त्रक्रिया मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. येणार्‍या काळात आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या सहकार्याने दरवर्षी हे आरोग्य शिबिर घेतले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यातील शिवसप्ताहात दुसर्‍या दिवशी 
मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच रुग्णांनी गर्दी केली होती. शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजयसिंह पंडित आणि त्याच्या सर्व समिती प्रमुख तसेच आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णाल, डॉक्टर, पारिचारिका यांनी परिश्रम घेतले. 

शिवसप्ताहात उद्या रांगोळी स्पर्धा
 शिवसप्ताहात तिसर्‍या दिवशी शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत भव्य खुली रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. खुला महिला गटाची स्पर्धा  महिला महाविद्यालय गेवराई येथे होणार असून या स्पर्धेत  प्रथम 5000 रुपये, द्वितीय 3000 रुपये तर  तृतीय  2000 रुपये पारितोषिके दिली जाणार आहेत 

शालेय गटाची.स्पर्धा न्यु. हायस्कूल व शारदा विद्यामंदिर गेवराई येथे होणार असून या स्पर्धेत  प्रथम 5000 रुपये, द्वितीय 3000 रुपये तर  तृतीय  2000 रुपये पारितोषिके दिली जाणार आहेत. दोन्ही गटातील चार स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 चे पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत महिला आणि विद्यार्थ्यांना  सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे संयोजक विजयसिंह पंडित यांच्यासह शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ पिसाळ, कार्याध्यक्ष विलास निकम, उपाध्यक्ष जयसिंग माने, शाहरुख पठाण, सुंदरबप्पा काळे, सचिव अमोल सुतार सहसचिव शेखर मोटे, अमजद शेख, कोषाध्यक्ष आदित्य दाभाडे, सहकोषाध्यक्ष वैभव पवार, संघटक बाबू मामडे, सहसंघटक पप्पू भुते यांच्यासह संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल