ताज्या बातम्या

गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड (रिपोर्टर):- महागाई कमी करण्याचे आश्‍वासन भाजपा सरकारने यापुर्वी अनेक वेळा दिले होते. मात्र महागाई कमी होण्या ऐवजी वाढत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आला. गॅसचे दर 144 रूपयाने वाढल्याने संताप व्यक्त केला जावू लागला. या दरवाढीच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. 
गेल्या काही दिवसापासून गॅसच्या दरात वाढ होत आहे. महंगाई कम करेंगे असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणूक दिले होते. महागाई कमी होण्याऐवजी वाढत आहे. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसू लागला. आता 144 रूपयाने गॅस वाढल्याने नागरीकात केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जावू लागला. गॅद दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शन करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.कृष्णा पंडित, दादासाहेब मुंडे, वचिष्ट बडे, अ‍ॅड.राहुल साळवे, योगेश शिंदे, श्रीनिवास बेद्रे, इद्रिस हाश्मी, गोविंद साठे, नागेश मिठे, कांबळे कडुदास, प्रित्येक 
दायमा, संतोष निकाळजे, शामसुंदर जाधव, जयदीप राऊत, परवेज कुरेशी, किरण अजबकर, बाबासाहेब झोडगे, सबदर देशमुख, शामसुंदर जाधव, इम्तियाज कुरेशी, राजाभाऊ बडे, शिवराज सिरसाट, सौरभ भागवत, शेख इफरोज, जयप्रकाश आघाव, बळीराम गिराम, योगेश बोबडे, महेश जाधव, जिजा जगताप, स्वप्निल चौरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष राज्यकिशोर मोदी यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल