ताज्या बातम्या

बीडच्या ऐतिहसिक शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी आ.संदीप क्षीरसागरांनी दिले जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निमंत्रण शासकीय शिवपुजेला पोलिस बँड पथकाचे प्रथमच मानवंदन यांची राहणार उपस्थिती

बीडच्या ऐतिहसिक शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी
आ.संदीप क्षीरसागरांनी दिले जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निमंत्रण
शासकीय शिवपुजेला पोलिस बँड पथकाचे प्रथमच मानवंदन
यांची राहणार उपस्थिती
गतवर्षीपासून शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होणारे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांची यावेळी विशेष उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आ.प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुरेश नवले, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सिराजभाई देशमुख, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.पृथ्वीराज साठे, जि.प.उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्यासह आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.
बीड (रिपोर्टर):- गेल्या दहा वर्षापासून बीडमध्ये मराठमोळ्या संस्कार संस्कृतीची जपवणूक करत आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोळाव्या शतकात घेवून जाणार्‍या शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी आ.संदिप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावर्षीही शिवजन्मोत्सव हा डिजेमुक्त ऐतिहासीक कला सादरीकरणाने होत आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शासकीय महापुजा होत असून या महापुजेला यावर्षी पोलीस प्रशासनाच्या बँड पथकाची मानवंदना होणार आहे. इतिहासात प्रथमच बीडमध्ये पोलीस पथकाची मानवंदना होत असल्याने या जयंती सोहळ्याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. आ.संदिप क्षीरसागरांनी या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधिक्षकांना आमंत्रित केले आहे. 
गेल्या दहा वर्षापासून आ.संदिप क्षीरसागर हे विना वर्गणी शिव जन्मोत्सव बीडमध्ये धुमधडाक्यात साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातल्या अनेक मर्दानी खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंतीमध्ये असतात त्यामुळे बीडची शिवजयंतीही राज्यभर चचेत असल्याचे दिसून येते. प्रत्येक वर्षी संदिप क्षीरसागरांच्या 
मार्गदर्शनात निघालेली शिवजयंती ही लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या जयघोषाने यशस्वी होते. अन् जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला पुढच्या वर्षी शिवजयंतीत काय असेल याची 
उत्सुकता लागते. अवघ्या पाच दिवसावर येवून ठेपलेल्या शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी झाली असून वर्गणी व डिजेमुक्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती चंपावतीनगरी (बीड शहर) च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शासकीय महापुजा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, 
सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत केली जाते. याचे निमंत्रण घेवून आ.संदिप भैय्या क्षीरसागर पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे गेले होते. गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या शिवजयंती उत्सव सोहळ्याची परंपरा महाराष्ट्राच्या पलीकडे गेली असून हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवत महिलांचा, लहान मुलांचा सक्रीय सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. पोलीस प्रशासनही यावर्षी आपल्या सोबत राहिल, शासकीय महापुजेला छत्रपती शिवरायांना पोलीस बँड पथकाची मानवंदना राहिल. त्याचबरोबर इतर काही कार्यक्रम घेण्यात येतील असे आश्वासित पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी शिवजयंती उत्सव समितीला केले. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर 2020 चे अध्यक्ष अक्षय जाधव, मावळते अध्यक्ष भाऊसाहेब डावकर आदी उपस्थित होते.

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल