ताज्या बातम्या

चोरट्यांनी भर रात्री बिअरबार फोडले, मात्र  सीसीटीव्हीत कैद झाले

डोळे झाकून दुध पिलेल्या मांजरा प्रमाणे गुन्हेगार गुन्हा करून फरार होतात, मात्र एक ना एक दिवस ते नक्कीच पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. चोर लहान असो अथवा मोठा असो चोर हा चोरच असतो. चोरटे हे कधी कोणती चोरी करतील हे सांगता येत नाही. कधी लहान चोऱ्या करतील, तर कधी मोठमोठ्या चोऱ्या करतील, प्रत्येक चोरांचे चोरीचे प्रकारही वेगवेगळे असतात. कोणी पोटासाठी चोरी करतात तर, कुणी भविष्यासाठी संपत्ती साठवतात. तर काहीजण झटपट श्रीमंत होण्याच्या लालची मध्ये मोठे मोठे दरोडे टाकतात. त्यामध्ये काहीजण पैसे चोरतात, तर काहीजण सोन्यावर डल्ला मारतात. तर कोणी वाहने चोरतात. व कुणी वेगवेगळ्या वस्तू वर डाव साधतात. काहींना तर वाटते असे आपण सतत अवैध काम करत राहील्याने आपल्या हातात पैसा खेळता राहील. आपण ऐश आरामात राहिलेले जीवन जगू, त्यामुळे आपण एखादा धाडसी चोरी चा निर्णय घेतला तर, कुणालाही पत्ता लागणार नाही. अशे त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. व एखाद्या धाडशी चोरीला अंजाम देऊन बसतात. पण त्यांचे हे विचार नक्कीच फेल ठरतात. हो हे खरे आहे. एखाद्या गुन्हेगारांनी गुन्हा केला तेव्हा तो कितीही मोठा असू द्या, बलाढ्य धनसंपत्ती वान असू द्या, त्याला देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाऊन लपून बसू द्या, भले गुन्हा घडून कितीही दिवस झाले तरी, "कानून के हाथ बहुत लंबे होते है" या म्हणीप्रमाणे एक ना एक दिवस त्यांच्या मुसक्या आवळल्याच जातात. अशेच बीड जिल्ह्यात दिंद्रुड शिवारात चोरट्यांच्या मनात आले, आणि त्यांनी भर रात्री चक्क बियरबारच फोडले. पैसे, दारू, विविध वस्तू सह दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले. मात्र पहा सीसीटीव्हीत हुबेहुब चोरटे कैद झाले. त्यानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाला त्यांच्या मुसक्या आवळण्यात कसे यश आले, वाचा सविस्तर क्राईम नामा मध्ये

बीड शहरापासून तब्बल 55 किलोमीटर अंतरावर, बीड ते परळी या महामार्गालगत, माजलगाव तालुक्यात दिंद्रुड या नावाचे गाव आहे. याच दिंद्रुड गावच्या हद्दीत, दिंद्रुड पासून तब्बल पाचशे मीटर अंतरावर, कैलास बाजीराव ठोंबरे, यांच्या मालकीचे एक बियर बार आहे. स्वागत बियरबार असे त्या बिअर बार चे नाव आहे. तब्बल दहा ते बारा वर्षापासून त्यांचे हे स्वागत बियरबार चालत आलेली आहे. 165 बाय 66 च्या अंतरामध्ये हे स्वागत बियर बार मोठ्या थाटात महामार्गालगत सुरू असते. ग्राहकांची ही या बियरबार कडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हा बियर बार मनमोकळ्या पद्धतीने ग्राहकाशी समन्वय साधत सुरू असल्याने, याठिकाणी ग्राहकांची ही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हॉटेलमध्ये सुसज्ज गार्डन तसेच कित्येक कामगार येथे काम करत असतात. हॉटेल चे कामगार मॅनेजर नित्यनेमाने आपली ड्युटी बजावत असतात. याच पद्धतीने दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी चा दिवस उजाडला. दिवसभर बिअरबार जोरात सुरू होता. सर्व कामगार कामात व्यस्त होते. कोणता ग्राहक पिण्यासाठी आला, व कोणता ग्राहक पिऊन गेला. याकडे सहसा कोणाचे लक्ष नव्हते. दिवसभर हॉटेल सुरू असल्याने, सर्वजण आपापल्या दररोजच्या प्रमाणे कामात व्यस्त होते. बियर बार मध्ये जागाही मनमोकळी असल्याने, बिअर च्या बाटल्या व बॉक्स आणि विविध प्रकारचे साहित्य बिनधास्त जिकडेतिकडे पडलेले असायचे. याचा फायदा उचलण्याचे, काही दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहक चोरट्यांनी ठरवले. त्याठिकाणी कित्येक दारुडे बेवडे बारमध्ये दारू पिण्यासाठी यायचे, व जायचे, एक दिवस याच स्वागत बियर बार मध्ये, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण या गावचा रहिवासी, असणारा, अमोल देविदास काळे व केज तालुक्यातील बनसारोळा या गावचा रहिवासी असणारा, त्याचा मित्र राजा अर्जुन पवार हे दोघे विविध ठिकाणी लहान मोठ्या छुप्या चोर्‍या करून मौज मजा करायचे. व कधीकधी त्या स्वागत बियर बार मध्ये दारू पिण्याच्या उद्देशाने जायचे व दारू पिऊन निघून जायचे, तेव्हा तेथील मॅनेजर अथवा कामगार तरी कशाला कोणत्या ग्राहकाला विचारपूस करत बसणार, किती ग्राहक येतात व दारू पिऊन जातात कोण कुणाकडे लक्ष देणार? हे पण खरेच आहे! मात्र हे पवार व काळे असेच एक दिवस दारू पिण्याच्या उद्देशाने आले होते. पण दारू पिऊन ते सहजासहजी गेले नाही, त्यांनी हॉटेल स्वागत बियर बारला चांगलेच निहाळून निरिक्षण केलं. हॉटेल परिसराला कोणत्या बाजूने काय आहे, हे सर्व पाहून घेतलं. हॉटेल ला पाठीमागून गेट आहे, एक शटर आहे. हॉटेलमध्ये बरेच काही मनमोकळ्या पद्धतीने पडलेले असतं.एखाद्या दिवशी रात्रीच्या वेळी या ठिकाणी आपला चांगलाच डाव साधू शकतो. असे विचार त्यांच्या मनात आले. व त्यांची ही मनात आलेले कल्पना ते सत्यात उतरवण्याच्या तयारीला लागले.

         दिनांक 20 जानेवारी रोजी हॉटेल दिवसभर सुरू होते. हॉटेलचे मॅनेजर बाप्पाजी त्रिंबकराव कराटे यांच्यासह, कामगार दिवसभर काम करून थकलेले होते. त्यामुळे काहीजण रात्री हॉटेल बंद केल्यावर आपापल्या घरी निघून गेले होते. तर काही कामगार हॉटेलमध्ये मुक्कामाला राहत होते. त्यांनी दररोजच्या प्रमाणे हॉटेल बंद करून, हॉटेलच्या वरच्या गच्चीवर सर्व कामगार झोपण्यासाठी गेले, दिवसभराच्या धावपळी मुळे ते गाढ झोपी गेले होते. रात्रीचे अडीच वाजलेले होते. सर्वत्र सामसूम वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांची ही अवस्था विरळ झालेली होती. रात किडे किडकिडीत होती. काळोख आंधार पडलेला होता. अशाच भयान काळोखाच्या रात्री या हॉटेलात चोरीचा डाव साधायचा विचार या दोघांनी केलेला होता. याच रात्री अडीच वाजता सावळेश्वर पैठण चा अमोल काळे व बनसारोळा या गावचा राजा पवार या दोघा मित्रांनी संगनमत करून, दिंद्रुड शिवारात पोहोचले. या स्वागत बियर बारला पाठीमागून चैनल गेट लावलेले होते. शिवारात प्रवेश केल्यानंतर या चोरट्यांनी रात्रीत अंधारात बारच्या पाठीमागच्या भागाकडे जाऊन पोहोचले. हॉटेलच्या जवळ येऊन पाहतात तर, त्यांना हॉटेलच्या कंपाउंड ला पाठीमागून चॅनेल गेट लावलेले दिसले. हे दोघे चोरटेही काय साधेसुधे नव्हते. त्यांनी जवळच्याच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कित्येक लहान-मोठ्या चोर्‍या करून मोठा धुमाकूळ घातलेला होता. त्यांच्या नावे त्या भागात त्या ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले होते. व हेच ते अट्टल चोरटे आहेत. त्यांनी भर रात्री गुपचूप कोणाला आवाज न होऊ देता त्या चैनल गेटचे कुलूप तोडले. आणि हॉटेलच्या आवारात प्रवेश केला. मात्र "फिल्म अभी बाकी है " या म्हणीप्रमाणे समोर जाऊन पाहतात तर, त्यांना हॉटेलच्या भिंतीला पाठीमागून एक शटर दिसले. दोघेही चतूर होते. त्यांनी तात्काळ त्या शटर चा आवाज येऊ न देता त्याचे कुलूप तोडले. व आत प्रवेश करायचा तर, त्यातील एकाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ बाहेरचे दोन्ही सीसीटीव्ही फोडून टाकले. व शटर वर करून दोघांनीही बियर बार मध्ये प्रवेश केला. मात्र सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले होते. तसेच आत मध्ये शोकेस मध्ये एलसीडी लावलेली होती. त्याठिकाणी आणि होम थेटर जोडलेले होते. सीसीटीव्हीच्या पीनाही त्या ठिकाणीच जोडलेल्या होत्या. त्यांनी सीसीटीव्हीची पिन समजून एलसीडी होम थेटरच्या पिना तोडल्या मात्र चोरट्यांनी त्याठिकाणी असणारी एक साधी पिन तोडलीच नाही, त्यांना वाटले एखाद्या बलपाची अथवा कशाचीही ती पिन असू शकते. असे म्हणत त्यांच्याकडून घाई गगबडीत ती पिन तशीच तोडायची राहिली. मात्र योगायोगाने तीच पिन सीसीटीव्हीची होती आणि सर्व बारच्या आत सी सी टी व्ही  चालूच होता. सीसीटीव्ही बंद झाला का चालू झाला हे घाई गडबडीत चोरट्यांना समजलेच नाही. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी सर्वत्र बारमध्ये मोठा ऱाडा करून, ठेवलेला होता. दारुच्या बाटल्यांची नासाडी केलेली होती. विविध वस्तूंची उचकापाचक करून ठेवलेली होती. तेवढ्यात एकाने पैशाच्या गल्ल्या कडे धाव घेतली, व गल्या जवळ जाऊन पाहिले तर, त्यांना तेथे रोख रक्कम आढळून आली. ती त्यांनी तात्काळ काढून घेतली आणि खिशात टाकली. व दारूच्या बाटल्या चे काही बॉक्स व एक बावीस इंची एलसीडी टीव्ही असे एकूण दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे भर रात्री फरार झाले. मात्र आत मधील काही सीसीटीव्ही चालूच राहिल्याने त्याच सीसीटीव्ही मध्ये चोरटे हुबेहूब कैद झालेले होते. हळूहळू पहाट होत होती. तेवढ्यात गच्चीवर झोपलेले काही कामगार बाथरूमला जाण्यासाठी खाली आले. आणि पाहतात तर हॉटेल च्या पाठीमागचे गेट आणि बारच्या पाठीमागच्या ही शटर चे ही  कुलूप तोडलेले त्यांना दिसले.तेव्हा बारमध्ये सर्वत्र बोभाटा झाला. झोपलेले सर्व कामगार जागे झाले. खाली येऊन पाहतात तर गल्यातीलही नगदी पैसे, तसेच एलईडी टीव्ही ही आणि दारूचे काही बॉक्स गायब झाल्याचे त्यांना दिसले. आणि काही सीसीटीव्ही फोडल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र हॉटेलात दनादिन अवस्था दिसून आली.अशी अस्तव्यस्त परिस्थिती पाहून, कामगारांनी तात्काळ याची माहिती हॉटेल मॅनेजर बाप्पाजी कराटे व मालक कैलास ठोंबरे यांना कळवली. ते तात्काळ त्याठिकाणी हजर झाले. व याची माहिती माजलगाव तालुक्यातील त्यांच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यास कळवली. माहिती मिळताच दिडरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गव्हाणकर आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ घटनेचा पंचनामा केला. व सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. तेव्हा फिर्यादी बाप्पाजी त्रिंबकराव कराटे वय 29 रा. दिंद्रुड यांच्या फिर्यादीवरून सहा वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 22/2020 नुसार कलम 457, 380 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

       दिंद्रुड च्या स्वागत बियर बार मध्ये चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर दिनांक 23 जानेवारी 2020 रोजी दरोडा प्रतिबंधक पथक या भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुपारचे अकरा वाजले होते. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि सावळे व त्यांचे कर्मचारी पेट्रोलिंग करण्यात व्यस्त होते. तेवढ्यात एका गुप्तचरामार्फत पथकास एक माहिती मिळाली. ही अशी खात्रीशीर माहिती होती की, बियर बार मध्ये चोरी करणारे चोरटे सावळेश्वर पैठण च्या परिसरात फिरत आहेत, तेव्हा सपोनि सावळे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. विविध ठिकाणी विचारपूस केली. व शोधाशोध घेत घेत हे पथक माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरापासून तब्बल 60 ते 70 किलोमीटर अंतर पार करून केज तालुक्यातील बनसारोळा गावचा परिसर गाठला.त्या ठिकाणी जाऊनही शोध सुरू केला. दुपारचे बारा वाजले होते. संशयित आरोपींच्या घरासमोर पोलिसांचे पथक घरासमोर जाऊन  उभे रहाताच हे  दरोडा प्रतिबंधक पथक त्या ठिकाणी पोहोचल्याचे पाहताच, सावळेश्वर पैठण येथील अमोल देविदास काळे व बनसारोळा येथील राजा अर्जुन पवार हे पोलिसांना पाहून घराच्या पाठीमागे सुसाट वेगात पळू लागले. एवढ्यात पोलिसांना त्यांचा चांगलाच संशय आला. पोलिसही त्यांच्यामागे त्यांचा पाठलाग करू लागले. तेव्हा त्यावेळी चोर-पोलिसांचा खेळ हा चांगलाच रंगला. अखेर पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावरच या दोघांनाही पकडून ताब्यात घेतले. व त्याची कसून चौकशी करत प्रथमत: त्यांचे नाव विचारून घेतले. व पळून जाण्याचे कारण विचारले असता, त्यांनी पोलीस पथकास उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तेव्हा बऱ्याच संशयानंतर पोलिसांनी दोन पंचा समक्ष त्यांच्या त्या घराची झाडाझडती घेतली. असता, त्या चोरट्यांच्या पत्र्याच्या शेड च्या घरामध्ये सिमेंटच्या गोण्यात चोरून आणलेला माल भरून ठेवलेला होता. तेव्हा सदर मालाची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकाने चोरट्यास विश्वासात घेतले. आणि विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता सदर माल हा चोरीचा असून तो आम्ही माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील बियर बार मधून चोरून आणलेला आहे. अशी त्यांनी कबुली दिली. त्यावेळी चोरट्यानी चोरून आणलेल्या दारूच्या बाटल्या, नगदी काही रक्कम, एलईडी टीव्ही यांच्यासह दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले.

सदर कामगिरी बीड जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख गजानन जाधव, सपोनि साळवे , नागरगोजे, चव्हाण, जायभाय सौंदरमल उबाळे  जोगदंड  मुन्ना वाघ  यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली

             संकलन
      प्रा सुनील जाधव 
   उपसंपादक दै बीड रिपोर्टर
       मो ९८२२६३७९२८  

अधिक माहिती: pro.sunil jadhav beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल