पिंपळनेर येथे राष्ट्रीयकृत बँक सुरू करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांसह गावकर्‍यांचे, आंदोलन

eReporter Web Team

पिंपळनेर येथे राष्ट्रीयकृत बँक सुरू करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांसह गावकर्‍यांचे, आंदोलन; शिवसंग्रामचा पाठिंबा 
बीड (रिपोर्टर):- पिंपळनेर हे गाव १५ हजार लोकसंख्येचे असून याठिकाणी राष्ट्रीयकृत बँक सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान या आंदोलनाला शिवसंग्रामने आपला पाठिंबा दिला आहे. 
   पिंपळनेर गणपतीचे हे गाव १५ हजार लोकसंख्येचे आहे. या ठिकाणी ४ हजार मतदारांची संख्या असून गावात आठवडी बाजारात भरतो. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पोलिस ठाणे आहे, शाळा, महाविद्यालय असून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नागरिकांना बीडसारख्या शहरामध्ये व्यवहारासाठी यावे लागते. त्यासाठी शासनाने गावात राष्ट्रीयकृत बँक सुरू करण्यास मान्यता द्यावी. या मागणीसाठी तेथील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केले आहे. या वेळी सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, हिंदजागृतीचे अशोक होळकर, पुण्यनगरीचे बळीराम म्हेत्रे, पुढारीचे रामेश्‍वर जाधव, लोकाशाचे गणेश तांबे, पार्श्‍वभूमीचे भगीरथ चरका, झुंजार नेताचे शिवप्रसाद सिरसट, तसेच उपसरपंच राजाभाऊ गवळी, कॉंग्रेसचे संभाजी जाधव यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like