अंबाजोगाईच्या  शाहीनबाग आंदोलकांना  जातीवाचक शिवीगाळ आरोपी ताब्यात, चौकशीनंतर माफीनामा आंदोलकांनी माफी दिली, विषय संपल्याचे म्हटले

eReporter Web Team

अंबाजोगाईच्या 
शाहीनबाग आंदोलकांना 
जातीवाचक शिवीगाळ
आरोपी ताब्यात, चौकशीनंतर माफीनामा
आंदोलकांनी माफी दिली, विषय संपल्याचे म्हटले
अंबाजोगाई (रिपोर्टर):- सीएए, एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या अंबाजोगाई येथील शाहीनबाग आंदोलकांना चारचाकी गाडीत आलेल्या एका तरुणाने जातीवाचक शिवीगाळ करत घटनास्थळावरून पसार होताना दुसर्‍या गाडीला धडक दिली. आंदोलकांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो हाती लागला नाही. मात्र सीसीटीव्हीत त्याची गाडी कैद झाल्यानंतर सदरचा माथेफिरू हा आडस येथील असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या विरोधात अंबाजोगाई पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. शिवीगाळीची सदरची ही घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आज सकाळी माथेफिरूला ताब्यात घेऊन त्याच्याकडून माफीनामा घेण्यात आला. शाहीनबाग आंदोलकांनी त्याला माफ करून विषय संपला असल्याचे सांगितले. 
   याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शाहीनबाग आंदोलन गेल्या आठड्यापासून सुरू आहे. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एम.एच. १२ क्यू.एस. ९६९६ या क्रमांकाच्या गाडी चालकाने आंदोलनस्थळी गाडी ब्रेक करून उपस्थित आंदोलकांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि तो घटनास्थळावरून पसार होत असताना समोरून येणार्‍या एका गाडीला त्याने डॅश मारला आणि तो तसाच सुसाट वेगाने आडसच्या दिशेने निघाला. काही लोकांनी त्याचा चनईपर्यंत पाठलागही केला. मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे आंदोलकांनी रात्रीच या प्रकरणी पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. आज सकाळी हिफाजत मिरखान तय्यब खान यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गाडीसह एकास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय लालासाहेब कांबळे हे करत आहेत. 
 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like