भाजपा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर भिडले एफआरपीच्या बिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

eReporter Web Team

भाजपा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर भिडले
एफआरपीच्या बिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
परळी (रिपोर्टर) माजी मंत्री पंकजा मुंडे संचालक असलेल्या पनगेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने शेतकर्‍यांचे एफआरपीचे बील दिलेले नाही. या बिलासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. रॅलीद्वारे कार्यकर्ते घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते न ऐकता घरासमोर बसले होते. पोलिसांनी सदरील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या कारणावरून मनसे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यात चांगलीच हमरातुमरी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
माजी मंत्री पंकजा मुंडे या पनगेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आहेत. या कारखान्याअंतर्गत ज्या शेतकर्‍यांनी ऊस दिलेला आहे. त्या शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे बिल देण्यात आले नाही. बिलासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पंकजा मुंडे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलन कर्ते घराकडे जात असताना भाजपाचे कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यात वादावादी होवून राडा झाला. यात एकाचे डोके फुटले. कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या घरासमोर बसल्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. एकूणच या आंदोलनावरून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like