शासकीय जिनींगवर शेतकर्‍यांची होवू लागली पिळवणूक वशिल्यावाल्यांना मिळते तात्काळ टोकन; ग्रीडरने चालवली मनमानी

eReporter Web Team

शासकीय जिनींगवर शेतकर्‍यांची होवू लागली पिळवणूक
वशिल्यावाल्यांना मिळते तात्काळ टोकन; ग्रीडरने चालवली मनमानी
बीड (रिपोर्टर) कापूस खरेदी केंद्रावर ग्रीडरच्या मनमानीपणामुळे शेतकर्‍यांना अडचणीला सामोरे तर जावे लागतच आहे. पण काट्यासाठी शेतकर्‍यांना आठ ते दहा दिवस जिनींगसमोर थांबावे लागते. ज्यांच्याकडे वशिला आहे त्यांना मात्र तात्काळ टोकन मिळत आहे. तसेच खराब कापूस असला तर तो एकतर परत पाठवला जातो किंवा त्याला कमी भाव लावला जात आहे. ग्रीडरची मनमानी थांबवण्याची मागणी केली जात आहे. बीड तालुक्यातील पार्वती, श्रीगणेश आणि एस.आर या तीन शासकीय जिनींग असून या जिनींगवर कापसाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. नंबरनुसार शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करून शेतकर्‍यांची होत असलेली पिळवणूक थांबवावी. अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून खाजगी आणि शासकीय जिनींगमार्फत शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जात आहे. कापसाचा शासकीय भाव 5325 असला तरी तितका भाव मात्र शेतकर्‍यांना मिळत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणावरून कमी भाव लावला जातो. एखाद्या शेतकर्‍याकडे चांगला कापूस असला तरी 5325 इतका भाव निघत नाही. बीड तालुक्यातील पार्वती, श्रीगणेश, एस.आर या जिनींगवर शासकीय खरेदी सुरू आहे. येथील ग्रीडर आपला मनमानीपणा करत शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. शेतकर्‍यांचा थोडा कापूस खराब असला तर त्याला अत्यंत कमी भाव लावला जातो. तर काही शेतकर्‍यांना कापूस खराब असला तर तो आणुच नका असे स्पष्ट बजावण्यात येत आहे. कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांना आठ ते दहा दिवस जिनींगसमोर थांबावे लागते. तरी त्यांचा नंबर येत नाही. ज्यांचा वशिला आहे त्यांना तात्काळ टोकन देण्याचे काम या तिन जिनींगच्या ग्रेडरकडून होत आहे. शेतकर्‍यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्याची मागणी केली जात आहे. नियमानुसार शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करावा असेही शेतकर्‍यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like