ट्रॅव्हल्स झाडावर धडकली, 5 प्रवासी जखमी 

eReporter Web Team

ट्रॅव्हल्स झाडावर धडकली, 5 प्रवासी जखमी 
बीड (रिपोर्टर) भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालकाने ट्रॅव्हल्स चालवत रात्री 1.30 वाजता म्हसोबा वाडी शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स आंब्याच्या झाडाला जावून धकडली. यामध्ये पाच प्रवाशी गंभीर जखमी झालेे असून त्यांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रूगणालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चालकाच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
  सपना ट्रॅव्हल्स (एम.एच.23 जे.800) ही रात्री कल्याण-बीड हायवेवर आष्टी तालुकयातील म्हसोबावाडी शिवारातील रस्त्यावर आली असता चालकाचा भरधाव वेगात ताबा सुटला. त्यामध्ये ट्रॅव्हल्स उजव्या बाजूच्या आंब्याच्या झाडाला जावून धडकली. त्यात सय्यद सत्तार, सय्यद जान (रा.हडपसर पुणे) व अन्य दोन गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात असताना चालक फोनवर बोलत असल्याची माहितीही प्रवाशांना दिली. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यामध्ये चालकाच्या विरोधात गुन्हा र.न.40/2020 कलम 279, 337, 338 सह कलम 250/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना.देवडे हे करत आहेत.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like