धनगर आरक्षणासाठी  मुंबईत पिवळे वादळ धडकलं

eReporter Web Team

धनगर आरक्षणासाठी 
मुंबईत पिवळे वादळ धडकलं
धनगर आरक्षण द्या अन्यथा कायदा हातात घेणार - भारत सोन्नर 
मुंबई (रिपोर्टर):- गेली सत्तर वर्षापासून धनगर समाज शांत आहे भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केला असून महाविकास आघाडीने कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये धनगर आरक्षण देण्याबाबतचा विश्वास दिला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करा अन्यथा कायदा हातात घेतला जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील असा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी आज मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनात दिली मुंबई येथे आझाद मैदानावर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने सुंबरान आंदोलनास सकाळी दहाच्या दरम्यान सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनास महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी भारत सोन्नर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरत आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या, शेळी मेंढी विकास महामंडळाच्या ऐवजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकास महामंडळ नाव करा व या महामंडळाला एक हजार कोटीची तरतूद करा, धनगर समाजाला आदिवासी धर्तीवर योजना लागू केल्या आहेत त्याची अंमलबजावणी तात्काळ  करा इत्यादी मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या या सुंबरान आंदोलनामुळे आझाद मैदानासह मुंबई पिवळीमय झालेली दिसली. या आंदोलनाचे लोन थेट विधान भवनात पोहचले व विधानसभेच्या अधिवेशनात पिवळ्या वादळाची चर्चा होऊ लागली या आंदोलनामध्ये हजारो ढोलकरी काटी, घोंगड, पिवळा फेटा बांधून महाराष्ट्रातून आंदोलनात सहभागी झाले होते भारत सोन्नरच्या धाडशी भुमीकेमुळे धनगर आरक्षण अमलबजावणीचा राज्य सरकारणे धसका घेतला आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून येणार्‍या धनगर समाजाच्या शेकडो गाड्या अडवण्यात आल्यामुळे पुणे-मुंबई मेगा हायवे काही तास जाम झाला होता.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like