पिंपळनेरमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली नगदी 11 हजारासह दोन घरातून लाखोंचा ऐवज लंपास

eReporter Web Team

पिंपळनेरमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली
नगदी 11 हजारासह दोन घरातून लाखोंचा ऐवज लंपास
पिंपळनेर (रिपोर्टर):- पिंपळनेर येथील प्रा. उमेश सोनटक्के व मनोहर केळगंद्रे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करत घराच्या दाराचे कुलूप तोडून आतमधील कपाटामधून सोनटक्के यांच्या घरातून नगदी 4 हजार आणि 6 तोळे 3 ग्रॅम सोने व केेळगंद्रे यांच्या घरातून नगदी 7 हजार आणि अंदाजे 7 तोळे सोने चोरून नेल्याची घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांसह एलसीबी दरोडा प्रतिबंधक, श्वानपथक, फिंगर प्रिंटस् पथक दाखल असून चोरट्यांची शोध पोलिस घेत आहेत. या चोरीच्या घटनेने पिंपळनेर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
    याबाबत अधिक असे की, पिंपळनेर येथील प्रा. उमेश सोनटक्के यांच्या निवासस्थानी आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करत त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले. या वेळी सोनटक्के हे दुसर्‍या घरात राहत होते तर त्यांच्या आई बाजुच्या खोलीमध्ये झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी बाजुच्या दोन घराच्या कड्या बाहेरून लावल्या. आतमधील कपाटामधून नगदी चार हजार आणि सात तोळे सोने चोरून नेले. याच घराशेजारी असलेले मनोहर लोभाजी केळगंद्रे यांचे बंद दारही चोरट्यांनी तोडून आतमधील कपाटामधून सुमारे नगदी सात हजार आणि नऊ तोळे सोने चोरून नेले. सदरची घटना सकाळी सोनटक्के यांना समजल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी पिंपळनेर पोलिसांना प्रत्यक्ष येऊन घटनेची माहिती दिली. सात वाजता घटनास्थळी पोलिस पाचारण झाले. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांनी वरिष्ठांना दिल्यानंतर सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला श्‍वानपथकासह फिंगर प्रिंटस् पथकाला पाचारण करण्यात आले. या वेळी दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्तळी भेट दिली. या घटनेने पिंपळनेर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरीत सुमारे सात लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरीस गेल्याने पोलिसही चोरट्यांचा माग काढण्यासाठी कामाला लागले आहेत. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भुतेकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही तक्रारदारांनी आपल्या तक्रारी पोलिसात दिल्या आहेत, मात्र दुपारी एक वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like