साठेबाजांनो तुमची खैर नाही  जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकाल तर खबरदार

eReporter Web Team


किराणा दुकानदारांनी अव्वाचे सव्वा भाव वाढवले
बीड (रिपोर्टर):- देशभरामध्ये 21 दिवस संचार बंदी असल्याने याचाच गैरफायदा किराणा दुकानदार घेवू लागले. सकाळी 11 ते 3 या दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास ढील दिली असल्याने नागरीक किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करून आहेत. त्यातच दुकानदाराने आज सगळ्याच मालाचे दर अव्वाचे सव्वा केल्याने सर्व सामान्य नागरीक मात्र अडचणीत सापडला. साठे बाजांची कसल्याही पद्धतीची खैर केली जाणार नाही. जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकणार्‍या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी योग्य त्या दरातच आपला माल विकावा व लोकांची पिळवणूक करू नये.
कोरोना व्हायरसमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. देशात 21 दिवस संचारबंदी लागू राहणार आहे. याचाच गैरफायदा जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे व्यापारी घेवू लागले. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी 11 ते 3 या दरम्यान सूट देण्यात आली आहे. आज सकाळी नागरीक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेले असता तेल, साखर यासह इतर मालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले. चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या व्यापार्‍याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापार्‍यांनी योग्य त्या दरामध्येच आपला माल विक्री करावा व संकटकाळी लोकांना वेठीस धरू नये.
 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like