मित्राचा खून करुन स्वत:चा खून झाल्याचा बनाव करणार्‍याच्या आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांची उल्लेखनीय कामगिरी

eReporter Web Team

मित्राचा खून करुन स्वत:चा खून झाल्याचा बनाव करणार्‍याच्या आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांची उल्लेखनीय कामगिरी
बीड (रिपोर्टर) :- स्वत: केलेल्या गुन्ह्यात जेलची हवा खावी लागणार म्हणून चक्क मित्राचा खून करुन स्वत:चा खून झाल्याब बनाव केल्याची घटना अंबाजोगाई शहरानजीक मुकुंदराज परिसरात बुटेनाथ जवळ  दि. 17 मार्च रोजी घडली होती. सुतावरुन स्वर्ग गाठणार्‍या पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक  तपासक करुन आरोपीस हैद्राबाद येथून जेरबंद केले. सदरील कारवाई अधिक्षक हर्ष पोद्दर, अप्पर अधिक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत आणि त्यांच्या टिमने केली. सदरील माहिती पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. 
     याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 मार्च 2020 रोजी  साबेर सत्तार करेशी वय 28 वर्षे रा . बाराभाईगल्ली , अंबाजोगाई याने फिर्यादी दिली की , त्यास दोन भाऊ सादेक , रसुल असून भाऊ सादेक हा त्याचे कुटूंबासह हैद्राबाद येथे एक महिण्यापुर्वी कामासाठी गेला होता, तो दिनांक 15 / 03 / 2020 रोजी रविवारी हैद्राबाद येथून अंबाजोगाईला आला होता. दिनांक 16 / 03 / 2020 रोजी भाऊ रसूल याने त्याची मोटार सायकल रात्री आठ वा. घेवून घराबाहेर गेला होता, तो रात्री परत आला नाही . दिनांक 17 / 03 / 2020 रोजी सकाळी आठ वा , भाऊ रसुल याने नेलेली मो. सायकल मंडीबाजार, अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्याचे बाजुला मिळून आली. भाऊ रसल घरी न आल्याने त्याचा शोध घेत असतांना समजले की, येल्डा जाणारे रोडचे बाजुस एक माणूस मरुन पडला आहे. त्यावरुन तो व आत्याचा मुलगा नसीर कुरेशी असे दोघांनी जावन पाहीले असता हसेन गवळी याचे शेतातील लिबाचे झाडाखाली भाऊ रसुल याचा मृतदेह दिसून आला . त्याचे चेह - याचा व डोक्याचा चेंदामेंदा झालेला दिसला. चेहरा ओळखू येत नव्हता. परंतु त्याचे अंगावरील कपडयावरुन व त्याचे खिशातील कागदपत्रावरुन सदरचा मृतदेह हा भाऊ रसूल याचा असल्याचे आम्ही ओळखून पोलीसांना सांगीतले. सदर ठिकाणी एक मोठा दगड रक्ताने माखलेला दिसून आला. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन दिनांक 16 03 / 2020 चे रात्री आठ ते दिनांक 17 / 03 / 2020 चे सव्वा चार वा . चे दरम्यान भाऊ रसुल सत्तार कुरेशी याचे डोक्यात दगड घालून त्यास जिवे मारुन खुन केला आहे. वगैरे फिर्यादवरुन पो. स्टे . अंबाजोगाई शहर येथे दिनांक 17 / 03 / 2020 रोजी गु . र . नं . 115 / 2020 कलम 302 , 201 भादवि प्रमाणे गन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयाची माहिती मिळताच  पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व स्टाफ अंबाजोगाई येथे आरोपीचे शोधासाठी पाठविण्यात आले. पो . नि . स्था . गु . शा . व त्यांचे कर्मचारी यांनी अंबाजोगाई येथे जावून घटनास्थळाची पाहाणी करुन माहिती घेतली. मयत रसल सत्तार रेशी याचे नातेवाईकांनी प्रेत त्याचेच असल्याचे ओळखून पी.एम, झाल्यानंतर प्रेत ताब्यात घेवून त्याचा अंत्यविधी केला. दरम्यानचे काळात माहिती मिळाली की, अंबाजोगाई येथील अलीम ईस्माईल शेख हा इसम 2 - 3 दिवसांपासून घरातून गायब असल्याचे त्याचे नातेवाईकांनी सांगीतले. त्यावरुन पोलीसांचा संशय वाढला, मयत रसुल कुरेशी याचे सोशल मिडीयावर फोटो पाहिल्यानंतर अलीम ईस्माईलचे नातेवाईकांना तो अलीम असावा असा संशय आला. तशी चर्चा अंबाजोगाई शहरात व मिडीयावर होवू लागली. त्यावरुन पोलीस अधीक्षक यांनी या चर्चेची गंभीर दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत व त्यांचे स्टाफला अंबाजोगाई येथे घटनास्थळी परत जावून पाहाणी व खात्री करुन बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले . त्यावरुन पो . नि . स्था . गु . शा व स्टाफ यांनी पुन्हा अंबाजोगाई येथे घटनास्थळी जावून बारकाईने पाहाणी करुन व गुन्हयात मयत दर्शविलेला इसम रसुल सत्तार कुरेशी याचे पत्नी , भाऊ व इतर नातेवाईक तसेच 2 - 3 दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेला इसम अलीम ईस्माईल शेख याची पत्नी, बहीण व इतर नातेवाईक यांचेकडे बारकाईने चौकशी केली, तसेच मयताचे अंगावर, घटनास्थळावर, मयत व बेपत्ता इसम अलीम शेख यांचे घरी मिळालेले वस्तुजन्य पुरावे. मिळालेली माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे पो . नि . स्था . गु . शा . यांना सदर गुन्हयात मयत झालेला इसम रसुल सत्तार कुरेशी नसून अलीम ईस्माईल शेख हा असल्याची जास्त शक्यता वाटली. मागील सहा महिण्यापासून रसुल सत्तार कुरेशी हा त्याचे कुटूंबासह हैद्राबाद येथे राहात होता, घटनेचे दोन दिवस अगोदर तो एकटाच अंबाजोगाई येथे आला होता. स्था . ग . शा . चे तपास पथकाने रसूल सत्तार कुरेशी बाबत माहिती घेण्यास सुरुवात केली, त्यात माहिती मिळाली की . रसल सत्तार करेशी व इतर ( 03 ) लोकांनी ऑगस्ट - 2016 मध्ये अंबाजोगाई शहरा जवळील राजाभाऊ औताडे रा. सेलूअंबा यांच्या राज पेट्रोल पंपाची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी मो. सायकलवर घेवून जाणारा त्यांचा मॅनेजर प्रकाश बाबूराव बोंदरे यास आडवून मारहाण करुन त्याचे जवळील 3.20,000 / - रुपये जबरीने चोरुन नेले होते. त्यावरुन रसुल सत्तार करेशी व इतर ( 03 ) लोकांविरुध्द पो . स्टे , अंबाजोगाई शहर गु . र . नं . 335 / 2016 कलम 394 , 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल
झाला होता, ती केस सध्या अंबाजोगाई कोर्टात पुराव्याला आली असून त्यात रसुल कुरेशी यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. असे तो त्याचे पत्नीस बोलला होता . त्यावरुन स्था . गु . शा . चे तपास टिमला अशी शक्यता वाटली की, रसुल कुरेशी याला स्वत : चे नाव आरोपीचे यादीतून कायमचे वगळले जावू शकते ही कल्पना ठरवून तो कोणाचा तरी खुन करुन स्वत : चा खुन झाल्याचा बनाव करावा, अशी शक्यता वाटल्याने स्था . गु . शा . पथक घटने नंतर एक वेळा दिनांक 21 / 03 / 2020 रोजी हैद्राबादला रसुल सत्तार कुरेशी याचे शोधासाठी गेले . तो त्याचे पत्यावर सापडला नाही , पथकाने त्या ठिकाणी त्याचेसाठी बातमीदार नेमले . दिनांक 25 / 03 / 2020 रोजी हैद्राबाद येथून बातमीदारा मार्फत पो . नि . स्था . ग . शा . यांना माहिती मिळाली की , रसुल सत्तार कुरेशी हा हैद्राबाद येथील संतोषनगर , पोलीस स्टेशनचे हद्यीत ईदी बाजार परिसरातील शानबाग फंक्शन हॉलमध्ये सध्या आहे . पो . नि . स्था . गु . शा . यांनी त्या बातमीची खात्री केल्यानंतर  पोलीस अधीक्षक , बीड यांना सदर माहिती कळविली . त्यानंतर मा . पोलीस अधीक्षक , बीड यांनी हैद्राबाद येथील त्यांचे समकक्ष अधिकारी यांचेशी बोलून रसुल सत्तार कुरेशी याचेवर पाळत ठेवण्यास विनंती करुन तात्काळ स्था , गु , शा , चे पथक हैद्राबादसाठी रवाना केले , स्था . ग . शा . चे पथकाने हैद्राबाद येथे जावून तेथील स्थानिक क्राईम बॅचची मदत घेवून दिनांक 26 / 03 / 2020 रोजी पहाटे दोन वा . चे सुमारास रसुल सत्तार कुरेशी यास ताब्यात घेतले . त्याला बीड येथे आणून विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व सन - 2016 मध्ये अंबाजोगाई ते कारखाना रोडवर राजाभाऊ औताडे यांचे पेट्रोल पंपाची रक्कम जबरीने चोरलेल्या गुन्हयात कोर्टातून शिक्षा होईल अशी शक्यता बळावल्याने दूरदर्शन वरील उ . ख . ऊ . मालीका पाहून माझ्या डोक्यात कल्पना सुचली की , मी मयत झाल्याचा बहाणा केल्यास माझे नाव कायमचे केस मधून वगळले जाईल , त्यावरुन मी एखाद्या निष्पाप व सहज बळी पडू शकेल अशा इसमाचा शोध चाल केला . सतत नशेत असणारा व नेहमी त्याच्याकडे ( रसुल कुरेशीकडे ) दारुसाठी पैशाची मागणी करणारा रसुलचा स्वत : चा मित्र अलीम ईस्माईल शेख रा . अंबाजोगाई याचा चेहरा त्याचे नजरे समोर आला . त्याप्रमाणे त्याने योजना तयार करुन दिनांक 14 / 03 / 2020 रोजी तो हैद्राबादहून निघून दिनांक 15 / 03 / 2020 रोजी अंबाजोगाईला पोहचला , दिनांक 16 / 03 / 2020 रोजी दुपारी अलीम शेखच्या घरी गेला , त्याचेशी गप्पा मारल्या . नेहमी प्रमाणे अलीमने त्याला दारु पिण्यास 50 / - रु . मागीतले , तेव्हा तो त्याला म्हणाला तुला पैसे देत नाही , तुला संध्याकाळी भरपूर खाऊ पिऊ घालतो , असे म्हणून निघून गेला . नंतर एक . दीड तासाने अलीम शेख घराबाहेर आला . रसुल कुरेशीने त्याची भेट घेतली . त्याला गवळीपुरा येथे नेवून दारु पाजली . नंतर दोघांनी गांजाची नशा केली व अलीम शेख यास सोबत घेवून मुकुंदराजकडे ( घटनास्थळाकडे ) नेले . जाताना सोबत दारु घेवून गेला . तेथे गेल्यावर अलीम शेख यास पुन्हा दारु पाजली . दारु व गांजाचे नशेत अलीम शेख झोपला . त्यानंतर रसुल कुरेशी परत अंबाजोगाई गावात घरी आला . हैद्राबादहून सोबत आणलेला स्वत : चा ड्रेस व लपवून ठेवलेले हत्यार सोबत घेवून घटनास्थळी आला व दिनांक 17 / 03 / 2020 चे रात्री अडीच - तीन वा . चे सुमारास त्याने सोबत आणलेल्या हत्याराने अलीम शेख याचा गळा कापला व त्याचे अंगातील कपडे काढून स्वत : चे कपडे अलीम शेख याचे अंगात घातले व चेहरा ओळखू येवू नये म्हणून रसुल कुरेशी याने मोठया दगडाने चेहरा ठेचून चेंदामेंदा केला व मयत हा रसुल कुरेशी वाटावा म्हणून मयताचे खिशात स्वत : चे तीन फोटो , ओळखपत्र , कागदपत्र ठेवून दिले व मयताचे कपडे / वापरलेले तिक्ष्ण हत्यार जवळच झाडीत टाकून भावाची मोटार सायकल मंडीबाजार जवळील दवाखान्याजवळ लावून हैद्राबादला निघून गेला , सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांसमोर आव्हान होते व परिस्थितीवरुन गुन्हा रहस्यमय दिसत होता . स्था . गु . शा . चे पथकाने अहोरात्र परिश्रम घेवून बारकाईने सखोल माहिती काढून कौशल्यपणास लावून गुन्हयाची उकल करुन सध्या कोरोना साथीची भयंकर परिस्थिती देशात , महाराष्ट्रात व हैद्राबाद येथे असल्याने सदर ठिकाणी जाणे कठीण असताना देखील दोन वेळा हैद्राबाद येथे जावून आरोपीचा शोध घेवून मोठया शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी अधिक्षक हर्ष ए . पोद्दार, अप्पर अधिक्षक स्वाती भोर, विजय कबाडे, डीवाएसपी राहूल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि . भारत राऊत, पो . उप . नि .  एकीलवाले , पो . स्टे . अंबाजोगाई शहरचे स . पो . नि . श्री . दहिफळे , स्था . ग . शा . चे पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे , बालाजी दराडे , तुळशीराम जगताप , शेख नसीर, विकास वाघमारे, मुकुंद तांदळे , शेख आसेफ , महिला पो , कर्म , संगीता सिरसाठ , चालक संजय जायभाये , अतुल हराळे , मुकूद सुस्कर तसेच पो . स्टे . अंबाजोगाई शहरचे पो कर्मचारी आवले , येलमटे यांनी केलेली आहे.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like