मंदिर -मजीद पूर्ण पणे बंद- हर्ष पोद्दार ...तर दुकानदारांवरही होणार गुन्हा दाखल- विजय कबाडे

eReporter Web Team

मंदिर -मजीद पूर्ण पणे बंद- हर्ष पोद्दार
...तर दुकानदारांवरही होणार गुन्हा दाखल- विजय कबाडे
ऑनलाईन (रिपोर्टर)
मंदिर, मजीद मध्ये गर्दी होत असून यामुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे मंदीर आणि मजीद पूर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर दुकानदार प्रशासनाच्या सुचनेचे पालन करत नसल्यामुळे आता त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे म्हणाले.
    पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
    यावेळी पुढे बालतांना अधिक्षक पोद्दार म्हणाले की, पोलिसांच्या वतीने कर्फ्यु काळातही नागरिकांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासन घेत आहे. याउपरही काही अडचण येत असेल आणि ती अडच दुर होत नसेल तर नागरिकांनी थेट मला एसएमएस किंवा फोन करावा. मात्र विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांना प्रसादच दिला जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर आतापर्यंत 65 जणावर कर्फ्युचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर अति अवश्यक सेवा देणार्‍यांना पास मिळणार असून त्यांनी त्या पास दाखवून सेवा पुरावी असे आवाहनही यावेळी हर्ष पोद्दार यंानी केले.  तर अप्पर पोलिस अधिक्षक म्हणाले की, बीड शहराचे चार भाग करण्यात येणार असून प्रत्येक भागात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मिळेल तिथूनच भाजीपाला घ्यावा.
आठवडी बाजारांना बंदी असतांनाही जिल्ह्यात पाटोदा, शिरुरसह काही ठिकाणी बाजार भरवण्यात आला. उद्यापासून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहक यांनी बाजारात जावू नये. ज्या किराणा दुकानदारांनी अजुनही दुकानासमोर मार्किंग केलेली नाही. त्यांनी तत्काळ मार्किंग करुन घ्यावी. अन्यथा कारवाई केली जाईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like