कोरोनाचा बीडमध्ये हाहाकार, संशयित तरुणाचा मृत्यू 

eReporter Web Team

मृत तरुणाचा स्वॅब तपासणीसाठी, अहवालाची प्रतीक्षा; आज पुन्हा जिल्हा रुग्णालयातून 
२० स्वॅब तपासणीसाठी पाठवले, जिल्ह्यातून पाठविलेल्या स्वॅबची संख्या ३० पेक्षा जास्त
बीड रिपोर्टर- आठवडाभरापासून कोरोना महामारीने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून सोडला असून काल संशयित म्हणून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा  मध्यरात्री मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज जिल्हा रुग्णालयातून २० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असून जिल्ह्यातून ३० पेक्षा जास्त स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती हाती येत आहे. सदरच्या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला ? हे अहवालानंतर लक्षात येईल. 
   गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव, धारूर तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. काल एकाच दिवशी १३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. काल पाठवलेल्या ३२ पैकी तिघांचे स्वॅबचे अहवाल राखून ठेवले असून त्यांचा अहवाल आज सायंकाळी येणार आहे. तर दुसरीकडे काल सायंकाळच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील १९ वर्षीय तरुण तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आला होता. त्या तरुणाचा स्वॅब घेण्यात आला मात्र रात्री १२ वा. ५ मिनिटांनी अचानक सदरच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी उशीरा सदरील तरुणाच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होणार आहे. कोरोना महामारीने बीड जिल्ह्यात प्रचंड हाहाकार उडवून सोडला आहे. 

 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like