पैशासाठी ७० वर्षीय आज्जीबाईंचा चक्क बँकेसमोरच मुक्काम

eReporter Web Team

गेवराई रिपोर्टर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने याचे परिणाम जनमाणसावर होत आहे. त्यातच बँकेचा व्यवहार करण्यासाठी नागरीकांच्या रांगा दिसून येतात. बँके समोर असलेली रांग आणि लवकर मिळत नसलेले पैसे याचा विचार करता एका ७० वर्षीय अजीबाईने चक्क बँकेसमोरच मुक्काम ठोकून सकाळी बँकेत पहिला नंबर लावून आपले पैसे काढून घेतले. 
गेल्या ६० दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांची प्रचंड हाल होवू लागले. बँकेसमोरा पैसे काढण्यासाठी रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय नियमाचे पालन करून बँकेसमोरच्या रांगा पाहता सर्वांनाच पैसे वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. असे सहजासहजी पैसे मिळत नसल्याने गेवराई येथील इंडिया बँकेसमोर शशिकलाबाई विठ्ठल पवार ही सत्तर वर्षीय महिला चक्क मुक्कामी थांबली होती. परवा रात्री बँकेसमोरच ही महिला झोपली आणि सकाळी महिला नंबर लावून वृद्ध महिलेने बँकेतून पैसे काढले. श्रावणबाळ योजने अंतर्गत योजनेतील लाभार्थी ही महिला असून या महिलेचे बँकेत पैसे जमा झालेले होते. त्यामुळे या महिलेने पैसे काढण्यासाठी बँकेसमोर मुक्काम केला. परवा रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान अजय मोटे, शेख सुफियान यांनी महिलेची विचारपूस करून तिला जेवण आणून दिले. तसेच गेवराई पत्रकारसंघाचे अध्यक्ष मधुकर तौर, उद्धव मडके, भागवत जाधव यांनी सदरील ठिकाणी जावून आजी तुम्हाला घरी सोडतोत आणि उद्या सकाळी पैसे काढण्यासाठी मदतही करतोत असे सांगितले. मात्र आजीबाई म्हणाल्या मी याच ठिकाणी झोपते आणि उद्या सकाळी पैसे काढते असे म्हणून त्या बँकेसमोर झोपल्या होत्या.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like