आजपासून २५ मे पर्यंत कापूस खरेदी केेंद्र सुरू राहणार 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील पणन महासंघ आणि केंद्रिय कापुस निगम(उउख)ची कापुस खरेदी केंद्रे शनिवार दि.२३ मे २०२०, रविवार दि.२४ मे २०२० व सोमवार दि.२५ मे २०२० रोजी सुरु ठेवण्यात यावीत व प्रत्येक शनिवारी कापुस खरेदी केंद्रे सुरु ठेवण्यात यावीत असे शिवाजी बड़े, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,बीड यांनी आदेश केले आहेत.
    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मान्यतेने जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांचा ऋAट दर्जाचा कापुस पावसाळयापुर्वी खरेदी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेले पणन महासंघ व केंद्रिय कापुस निगम (उउख) यांच्या सर्व कापुस खरेदी केंद्रावर दररोज प्रत्येकी ८० ते १०० वाहनाचे मोजमाप करण्यात यावे असे सूचित केले आहे. मार्च-२०२० पासुन राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत असुन, बीड जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.अद्यापही लॉकडाऊन कायम असुन सद्यस्थितीत थोडी सवलत देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात प्रामुख्याने कापसाचे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.जिल्ह्यातील कापुस बिक्री साठी बाजार समित्यांकडे दि.१३ मार्च २०२० पर्यंत प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांची संख्या २४९२१ एवढी असुन त्यापैकी अद्याप २१००० शेतकन्यांचा कापुस विक्री होणे बाकी आहे. सदर कापुस हा लॉकडाऊन कालावधीत विक्री होऊ शकलेला नाही. त्यामुळे शेतकरी त्यांनी घेतलेल्या पिक कर्जाची परतफेड करु शकलेले नाहीत. सदर कापुस हा शेतकर्‍यां कडेच घरी साठवून ठेवलेला आहे. पुढील वर्षाचे खरिप हंगामाची पूर्व तयारी जसे बि-बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकर्‍याकडे असलेल्या कापसाची विक्री होणे आवश्यक आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like