Accident near Neknur; The young man died on the spot

eReporter Web Team

नेकनूर (रिपोर्टर) येथून जवळच असलेल्या चंद्राई हॉटेलसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जागीच ठार झाल्याची घटना धडली आहे. अपघात इतका भिषण होता की, तरूणाच्या डोक्यातील मेंदू बाहेर पडला होता. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भंडारवाडी येथील प्रविण योगीराज गमे हे नेकनूर ते येळंबघाट पहाटे पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघात इतका भिषण होता की, त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून मेंदू बाहेर पडला होत. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास बामदळे, खांडेकर, युनूस बागवान यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दरम्यान हा अपघात आहे की घातपात? अशीही चर्चा होत असून पोलिस त्यादिशेने तपास करत आहेत.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like