बीडमधून १० तर गेवराईतून  ९ स्वॅब तपासणीसाठी पाठविले

eReporter Web Team

कालच्या सहा अहवालांचीही बीडकरांना प्रतीक्षा
बीड/गेवराई (रिपोर्टर)- काल ४२ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर ३० स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर ७ नमुने प्रलंबीत आले होते. त्यातील एक आष्टीचा रुग्ण कोरोनाबाधीत निघाला. सहा नमुने प्रलंबीत आहेत. आज नव्याने जिल्हा रुग्णालयातून १० तर गेवराईतून ९ स्वॅबचे नमुने पाठविण्यात आले आहेत. येथून २६ नमुन्यांची प्रतीक्षा बीडकरांना आहे. 
  गेल्या पाच दिवसांपूर्वी बीडमध्ये मुसंडी मारलेल्या कोरोनाचा काल फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर सहा नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. आज जिल्हा रुग्णालयात नव्याने दहा स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कालचा एक आणि २९ असे ३० बाधीत रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गेवराईतून आज नव्याने ९ नमुने पाठविले. 

पात्रूडच्या ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कात दोन शासकीय कर्मचारी आले
माजलगाव तालुक्यातील पात्रूड येते कोरोनाचे ११ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या संपर्कात एक आरोग्य सहायक आणि एक आशा वर्कर असे दोन कर्मचारी आले असून या दोघंना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅब आज संध्याकाळी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like