धारूर, बीड, केज, माजलगाव, अंबाजोगाई या चार तालुक्यातून १८ प्रवाशांनी केला प्रवास

eReporter Web Team

धारुरच्या पाच बस सोडल्या त्यात ३७० रुपये आले
केज (रिपोर्टर) गेल्या दोन महिन्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद आहेत. जिल्हांतर्गत बसला वाहतूक करण्यास परवानगी दिल्यानंतर काल बस धावल्या. त्यात धारू, बीड, केज, माजलगाव, अंबाजोगाई या तालुक्यातून १८ प्रवाशांनी प्रवास केला. धारूर डेपोतून पाच गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या पाच गाड्यातून ३७० रूपये जमा झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या बसेसही बंद करण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून बस बंद असल्याने महामंडळाचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले. काल महामंडळाच्या बसेस जिल्हांतर्गत धावल्या. बस धावल्या असल्या तरी त्यात प्रवाशी नसल्याचे दिसून आले. धारूर, बीड, केज, माजलगाव, अंबाजोगाई यातालुक्यातून १८ प्रवाशांनी प्रवास केला. धारूर डेपोच्या पाच बस सोडण्यात आल्या होत्या. या पाच बसेसमधून ३७० रूपये महामंडळाला जमा झाले आहेत. सर्वत्र बंद असल्याने प्रवाशी जाणार कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like