कोरोना महामारीत जिल्ह्यातले २०० विद्यार्थी रशियात अडकले

eReporter Web Team

केंद्र सरकारचे दुर्लक्ष, महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे 
बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे 
आम्हाला भीती वाटतेय, मायदेशी यायचंय, आम्ही घरात बंद आहोत,  आम्हाला दिलं जाणारं अन्न पाकिट 
घेण्याचीही भीती वाटते, असे म्हणत रशियात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी रिपोर्टरला सांगितली आपबिती 

बीड (रिपोर्टर):- कोरोना महामारीने जगभरात उच्छाद् मांडला असून जो तो सुरक्षेच्या दृष्टीने आपले घर गाठत आहे, मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात असलेल्या महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप पावेत आपलं घर गाठता आलं नाही. कोरोनाबाधीत हायर झोनमध्ये असलेल्या पाच देशांपैकी रशिया एक कोरोनाबधीत देश असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे रशियामधून गेल्या दोन दिवसात चार ते पाच विद्यार्थ्यांनी रिपोर्टरशी संपर्क साधून आम्हाला आता या ठिकाणी भीती वाटत आहे. केेंद्र सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आता महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आम्हाला आमच्या घरी परत आणावे, अशी कळकळीची विनवणी केली आहे. तेव्हा बीड जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न करावा. 
   कोरोनाबाधीत हायर झोनमध्ये असलेल्या पाच देशांपैकी रशिया एक कोरोनाबाधीत देश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. येथील लोक आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आहेत. प्राप्त माहितीनुसार बीड जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियातल्या वेगवेगळ्या प्रांतातील विद्यापीठांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आहेत. बश्कीर स्टेटमधील विद्यापीठात रिपोर्टरच्या परिचयाचे आठ ते दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून बीड जिल्ह्यातील त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांनाही आपल्या घरी परतायचे आहे, परंतु केंद्र सरकार त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येते. गेल्या तीन दिवसांच्या कालखंडात रशियामधील वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणारे चार ते पाच विद्यार्थ्यांनी रिपोर्टरशी संपर्क साधून तेथील आपबिती सांगितली. आम्ही घरातच असून आम्हाला दिलं जाणारं खाद्य पाकिट घेण्याचीही आम्हाला भिती वाटते. आम्हाला येथून आमच्या घरी आणण्यासाठी प्रयत्न करा, बीड जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी रशियातील पाच स्टेटमधील विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. आता बीड जिल्हा प्रशासनाने आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे. 
अमरसिंहांच्या माध्यमातून शरद पवारांनी घेतली दखल
बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थंनी विधान परिषदेचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडेही आपली आपबिती सांगितली तेव्हा अमरसिंहांनी संबंधित विद्यार्थ्यांना धीर देत याची माहिती तात्काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यापर्यंत पोहचती केली. पवारांनी या बाबीची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी हालचाल सुरू केली असून महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांची यादी शरद पवारांनी मागविली आहे. 
केंद्र सरकार दखल घेत नाही 
रशियातील वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणारे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका विद्यार्थ्याने रिपोर्टरशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. इथली परिस्थिती भयावह आहे, आम्हाला दिले जाणारे खाद्य पाकिटही आम्हाला घेण्याची भीती आहे. इथे कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. आम्हाला भारतात परत यायचे आहे, याबाबत आम्ही केंद्र सरकारला मेल केले आहेत मात्र केंद्र सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. असं संबंधित विद्यार्थ्यांनी म्हटले.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like