पाली तलावाजवळ बसलेल्या मित्रांवर टोळक्याचा हल्ला; दोघे गंभीर जखमी

eReporter Web Team

७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर)- पाली तलावाच्या भिंतीजवळ गप्पा मारत बसलेल्या चार मित्रांवर पाली येथील टोळक्याने येथे का बसलात ? असं म्हणत नाव सांगितल्यानंतर टोळक्याने आक्रमक होत हल्ला चढवला. लाथा-बुक्क्यांसह बेल्टनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने मोठमोठे दगडही मारले. हल्लेखोरांचा आक्रमक भाव पाहता चौघांपैकी दोघे मित्र जीव वाचवून तेथून पळाले मात्र दोघे जण यात गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी या चौघांच्या दोन मोटारसायकलीही दगडे टाकून तोडफोड केल्याची घटना काल घडली. या हल्ल्यात जखमी झालेले शेख यूसुफ व हबीब अब्दुल रहेमान या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील यूसुफ यांची प्रकृती गंभीर आहे. 
   शेख यूसुफ शेख खदीर (रा. बालेपीर) हे आपला मित्र सय्यद अक्रम सय्यद अली, शेख रियाज शेख रफिक, हबीब अब्दुल रहेमान यांच्यासह मोटारसायकलने पाली तलावाजवळ गेले. तेथील भींतीजवळ गप्पा मारत बसले असता पाली येथील गोविंद मधू गायकवाड, विशाल बंडू नवले, प्रशांत वचिष्ठ नवले, महेश मधूकर नवले, ओंकार आबा नवले, गुड्ड्या उर्फ बबल्या यांच्यासह अन्य जणांचं टोळकं त्याठिकाणी आलं. ‘तुम्ही कोण आहात, इथे का बसलात?’ असे म्हणत या टोळक्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आम्ही नाव सांगितल्यानंतर ते अधिक चिडले आणि हातात येईल त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्क्यांसह बेल्टने बेदम मारहाण सुरू राहिली त्यावेळेस यातील दोघे जण जीव वाचवून पळाले मात्र या टोळक्याच्या हाती लागलेले शेख यूसुफ व हबीब अब्दुल रहेमान हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात शेख युसुफ यांच्या फिर्यादीवरून गोविंद गायकवाड याच्यासह सात जणांविरोधात कलम ३०७, ३२४, ५०४, ५२७, १४३, १४७, १४८, १४९, १८८, २६९, २७० भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like