नागरीकांनो,दुचाकी घेवून घराबाहेर पडतात तर सावधान डबल सीट असाल तर भरावा लागेल दंड

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):- २२ मार्चपासून लॉकडाऊन असलेला जिल्ह्यात आजपासून बर्‍यापैकी सुट देण्यात आली आहे. सुट देण्यापुर्वी राज्य शासनाने अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे दुचाकीवर फिरतांना एकच व्यक्ती असणे ही महत्त्वाची अट आहे. त्यामुळे नागरीकांनी दुचाकीवर डबल सीट बीड जिल्ह्यात फिरू नये अन्यथा त्याला जागेवरच दंड द्या अशा सक्तीच्या सूचना वाहतूक पोलीसांना वरीष्ठांनी दिल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी दुचाकीवर डबल सीट फिरू नये.
आजपासून बीडमध्ये बर्‍यापैकी सुट असली तरी नागरीकांनी कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुचाकीसाठी एक, तीन चाकीसाठी ३, चार चाकीसाठी ३ असे नियम घालून दिले आहेत. मात्र बीडच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी घेवून नागरीक फिरतात अशा वेळी एका दुचाकीवर एकच व्यक्ती असणे बंधनकारक आहे. जर नागरीकांकडे सर्व कागदपत्रे असतील अन तो डबलसीट असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. त्यामुळे विनाकारण डबलसीट फिरून पोलीसांसाशी हुज्जत घालणार्‍यावर थेट दंडात्मक कारवाई करा असे वाहतुक पोलीसांना वरिष्ठांनी आदेश दिल्याचे समजते. तळेकर यांची बदली झाल्यानंतर जिल्हा वाहतुक शाखेचा पदभार एपीआय मारोती मुंडे यांनी घेतला. तेंव्हापासून ते वाहतुक सुरळीत करण्यासाठी स्वत: रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्यामुळे वाहतुकीला शिस्त लागत आहे.

Image may contain: one or more people, people sitting, sunglasses and close-up

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे नागरीकांनी तंतोतंत पालन करावे, वाहतुक पोलीस हे आपल्याच सुरक्षिततेसाठी अहोरात्र रस्त्यावर आहेत. विनाकारण कोणावरही अन्याय होणार नाही मात्र नियम मोडून पोलीसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका. 
-एपीआय मारोती मुंडे,
जिल्हा वाहतूक शाखा बीड


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like