१८ लाख ५० हजार कापूस बियाणाच्या पाकीटाला मंजुरी खरीप हंगाम तयारी

eReporter Web Team

१८ लाख ५० हजार कापूस बियाणाच्या पाकीटाला मंजुरी
खरीप हंगाम तयारी

मजीद शेख | बीड
जून महिना उजाडला की, शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत असतात. पाऊस वेळेवर पडला की, खरीपाच्या पेरणीला सुरूवात होते. काल जिल्ह्यातल्या बहुंताश भागामध्ये धुवांधार पाऊस पडला. या पाऊसामुळे शेतकर्‍यांनी मशागतीला सुरूवात केली. तसेच बियाणे खरेदी करण्यासाठीही शेतकर्‍यांनी दुकानदारांकडे सकाळपासूनच गर्दी केली होती, जिल्ह्यात ८ लाख २२ हजार खरीपाचे क्षेत्र आहे. या पैकी अंदाजे ३ लाख ७२ हजार ५०० हेक्टरमध्ये कापसाची लागवड होते. कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या बियाणाची उन्हाळ्यामध्येच तयारी केली जाते. कृषी विभागाने १८ लाख ५० हजार कापूस बियाणाच्या पाकीटाला मंजूरी दिली. आतापर्यंत १० लाख ८७ हजार कापसाच्या पाकीटाचा पुरवठा झाला. 
शेतकर्‍यासाठी खरीप हंगाम महत्वाचा मानला जातो. जून महिना उजाडला की, शेतकरी शेतीच्या मशागतीला सुरूवात करुन बि-बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत असतात. पाऊस वेळेवर व चांगला पडला की, जूनमध्ये लागवडही होते. काल बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वार्‍यासह पाऊस पडला. या पाऊसामुळे शेतकर्‍यात समाधान व्यक्त केले जाऊ लागले. या पावसाने शेतकर्‍यांना शेतीची मशागत करता येणार आहे. त्यातच आज सकाळपासून अनेक शेतकर्‍यांनी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडे गर्दी केली होती. बीड जिल्ह्यात खरीपाचे ८ लाख २२ हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात कापूस लागवडीवर जास्त प्रमाणात भर दिला जातो. त्यानंतर सोयाबीनची लागवड होते, कापसाचं एकूण लागवडीचं क्षेत्र ३ लाख ७२ हजार ५०० हेक्टर पर्यंत आहे. तर २ लाख ५२ हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड होते. बाजरीचे क्षेत्र ६८ हजार हेेक्टर इतके आहे. कृषी विभागाकडून उन्हाळ्यामध्येच बियाणाची मागणी केली जाते. कृषी विभागाने १८ लाख ५० हजार कापूस पाकीटाच्या बियाणाला मंजूरी दिली. त्या पैकी १० लाख ८७ हजार कापसाच्या पाकीटाचा पुरवठा झाला. बियाणा सोबतच खताचीही मागणी केली जाते. १ लाख ४८ हजार १७० मॅट्रीक टन खत मंजूर करण्यात आले. रब्बी हंगामाचे ३१ हजार ८०० मॅट्रीक टन खत शिल्लक आहे. आतापर्यंत २७ हजार मॅट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे.
रुंद सरा,वरंभी पध्दतीने 
लागवड करावी
पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी लागवडीला सुरूवात करायला हवी. त्याच बरोबर रुंदसरा, वरंभी पध्दतीने  लागवड केल्याने याचा चांगला फायदा होतो. अशा पध्दतीने लागवड केल्यास २० टक्के अधिक उत्पन्नात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने संागण्यात आले.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like